महाराष्ट्रराजकीयसातारा

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)जावली तालुका यांच्या वतीने जाहीर निषेध

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — सुरेश पार्टे


मेढा. दि.१२. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल या महापुरुषांनी भीक मागून शाळा चालवल्या असे अपमानजनक व बहुजन समाजाला दुखावेल असे वक्तव्य केलेले आहे त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आ ) जावली तालुक्याच्या वतीने तहसीलदार कार्यालय मेढा येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

फोटो
निवेदन देताना एकनाथ रोकडे, डॉ . संपतराव कांबळे व पदाधिकारी , कार्यकर्ते
(छायाचित्र -सुरेश पार्टे )

महामानवांच्या कार्याचा परिपूर्ण अभ्यास असल्याशिवाय कुठल्याही नेत्यांनी अशी वक्तव्या करणे चुकीचे आहे त्यामुळे समाजिक भावना दुखावल्या जातील हे लक्षात घेतले पाहिजे. चंद्रकांत पाटील यांचे महापुरुषांनाबद्दलचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे ,यापुढील काळामध्ये सर्वच नेत्यांनी महापुरुषांच्या बद्दल कोणतेही वक्तव्य करण्याअगोदर त्याची गांभीर्यता लक्षात घ्यावी तसेच शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केल्यास ते कदापी सहन करणार नाही त्याची वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींनी नोंद घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिला.

याप्रसंगी रिपाईचे माजी तालुका अध्यक्ष डॉ संपत कांबळे ,दत्तात्रय जाधव ,प्रवीण कांबळे ,विकास जाधव ,अनिल शिंदे ,नितीन जाधव , संजय कांबळे, किशोर जाधव विजय शिंदे ,निलेश शिंदे , संतोष खरात ,काशिनाथ कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते . तसेच शाहीफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोज गडबडे व त्यांच्या दोन साथीदारांच्यावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन पोलिस यंत्रणेने टाकलेला खुनाचा प्रयत्न केल्याचा चुकीचा गुन्हा प्रशासनाने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सामाजिक क्रांती घडून २०२४ ला आंबेडकरी जनता सरकारला सत्तेवरून खाली खेचेल असा इशाराही आंबेडकरी संगटनेच्या बैठकीत देण्यात आला .

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!