महाराष्ट्रराजकीयसातारा

ओझरे ग्रामपंचायत निवडणुक सरपंच कोण होणार याकडे मुंबईकरांसह जावळी तालुक्याचे लागले लक्ष

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज— युवराज धुमाळ

मेढा. दि.१७. जावळी तालुक्यात राजकीय दृष्टया संवेदनशीत गाव म्हणून ओझरे ओळखले जाते . मागील निवडणूकही अतीतटीची होऊन अजितराव आणि शिवाजीराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास संयुक्त आघाडीची सत्ता आली आणि अजितराव उपसरपंच झाले.

गेल्या पाच वर्षात आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्फत गावात 3 कोटीची विकासकामे केली. यामध्ये नुकतीच मंजूर झालेली 86 लाखाची नवीन पाणी पुरवठा योजनेचाही समावेश आहे . वि .का.स सेवा सोसायटीची सत्ता ही अजितरावांनी विरोधकांकडून खेचून आणली होती.त्यामुळे गावातील प्रस्थापित राजकारण्यांच्या अस्तित्व धोक्यात येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.असे ओझरे गावासह आजूबाजूच्या परिसरात बोलले जात आहे.ओझरे गावात अनेक नेत्यांचे गट आहेत.यामध्ये माझी आमदार सदाभाऊ सपकाळ,जि .प. सदस्य दिपक पवार , माझी सभापती सुहास गिरी आणि मा.आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे दोन गट असे गट कार्यरत आहेत .

अजितराव सरपंचपदाचे प्रबळ दावेदार आहेत .परंतु अजितराव सरपंच होता कामा नये यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, मुलभूत समस्या रस्ते , पाणी , आरोग्य ,यांवर अजितरावांनी पाच वर्षात चांगले काम केले .कोरोनाकाळातही लोकांच्या मदतीला धावले त्यामुळे अजितरावांना ग्रामस्थ,महिला आणि खास करून तरूणांचा वाढता पाठींबा मिळत आहे .या कामांच्या जोरावर आणि आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या सहकार्याने विरोधकांना पुन्हा चिटपट करणार असा दावा अजितराव मर्ढेकर करत आहेत, तर एकवटलेले विरोधक सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत आहेत . शेवटी ओझरेकर कोणाच्या पारडयात मतदानाचे दान टाकणार हे निकाला दिवशीच समजेल.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!