महाराष्ट्रसातारासामाजिक

चला जाणूया नदीला कार्यक्रम जावली तालुक्यात उत्साहात साजरा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज — युवराज धुमाळ

मेढा. दि.१७. मेढा नगरपंचायत मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्रात चालू असलेला 75 नद्यांची यात्रा अर्थात चला जाणूया नदीला हा कार्यक्रम मेढा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात क्षेत्र महाबळेश्वर येथून झाली होती आज ही यात्रा मेढा येथे आली होती त्या निमित्ताने मेढा नगरपंचायत मार्फत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

या मध्ये नदी बद्दल जनजागृती करण्यासाठी मेढा मुख्य चौक ते वेण्णा नदीतीर व तेथून कलश मंगल कार्यालय पर्यंत शाळा व महाविद्यालयातील मुलाची प्रभातफेरी काढण्यात आली होती वेण्णा नदीतरी गेल्यावर तेथे मान्यवरांच्या हस्ते नदीमध्ये कलश पूजन करण्यात आहे त्यानंतर कलश मंगल कार्यलय येथे चला जाणूया नदीला या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कृष्णा खोरे सिंचनविभाग चे अधीक्षक अभियंता तथा चला जाणूया नदीला या प्रकल्पाचे सचिव श्री अशोक पवार साहेब होते तसेच त्यांच्यासोबत श्री प्रदीप पाटणकर,समन्वयक,श्री अमोल पवार मुख्याधिकारी मेढा नागरपंचत, श्री परदेशी साहेब वनविभाग मेढा,बजरंग चौधरी समन्वयक,प्रवीण पवार,समाजसेविका उषा उंबरकर, सुरेश पार्टे व मेढा नगरपंचायत व वनविभागचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच प्राथमिक शाळा मेढा, वेण्णा विद्या मंदिर मेढा, व आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे सर्व शिक्षक व विध्यर्थी उपस्थित होते.या सर्वांचा सत्कार मेढा नगरपंचायत मार्फत करण्यात आला या कार्यक्रमामध्ये श्री अशोक पवार यांनी नदीला जपुया या कार्यक्रमवद्दल योग्य मार्गदर्शन केले.

तसेच श्री प्रदीप पाटणकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन श्री मंगेश गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याधिकारी श्री अमोल पवार यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन श्री प्रमोद कुंभार यांनी केले होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!