क्रीडामहाराष्ट्रसातारा

कु.सिद्धी धनावडेचे एक सुवर्ण व तीन रौप्य पदकांसह वॉटर पोलो व इतर स्पर्धेत दैदिप्यमान घवघवीत यश!

मेढा.दि.१५.बालेवाडी ( पुणे ) येथेनुकत्याच वॉटर पोलो,मॉडर्न पेंटाथलॉन व ट्रायथलॉन या प्रकरातील,शासकीय महाराष्ट्र राज्य मिनी ऑलम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढाची बिकॉम भाग एकची विध्यार्थीनी कु.सिद्धी सुरेश धनावडे हिने,वॉटर पोलो प्रकारात सुवर्ण, मॉडर्न पेंटाथलॉन प्रकारात दोन रौप्य आणि ट्रायथलॉन प्रकारात एक रौप्य पदक मिळवीत एकूण चार पदकांची कमाई करतदैदिप्यमान कामगिरी केली.

जावली तालुका खरे तर दुर्गम आणि डोंगराळ भाग,या परिस्थितीतही,सिद्धीने सर्व अडीअडचणीवर मात करत आणि मेहनतीने,कु.सिद्धीने मिळवलेले हे यश म्हणजे निश्चितच कौतुकास्पद आहे.तिच्या या यशाबद्दल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी,उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे,महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कु. सिद्धी सुरेश धनावडेच्या या घावघवीत यशाबद्दल तिचे कौतुक व अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!