महाराष्ट्रसातारासामाजिक

महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजि. नं. पी एन 5139 ची राज्य विस्तार सभा संपन्न


मेढा. दि .१४.महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजि. नं. पी एन 5139 ची राज्यविस्तार सभा संपन्न पंचायत समिती जावली मेढा या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडली.

या राज्यविस्तार सभेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कर्मचारी उपस्थित झाले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष. अविनाश दुर्गावळे, उपाध्यक्ष. बबन हिरवे, संघटक. राजेश माने आणि गुलाब भाऊ मर्ढेकर यांनी उपस्थिती दाखवली. संघटनेला जेव्हा मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण पाठिंब्याने संघटनेच्या बरोबर उभी राहील असं आश्वासन अध्यक्ष. अविनाश दुर्गावळे तसेच संघटक. राजेश माने यांच्याकडून देण्यात आले. या कार्यक्रमाला जावली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काळे साहेब तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी मासाळ साहेब यांच्याकडून संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्रामपंचायत कर्मचारी हा महाराष्ट्र स्थापनेपासूनच दुर्लक्षित घटक आहे आणि त्याला न्याय आणि त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पी एन 5139 पूर्ण ताकतीनिशी लढा देईल अस आश्वासन अध्यक्ष पंढरीनाथ मर्ढेकर राज्याध्यक्ष विवेक पोहेकर तसेच संघटक महादेव जंगम यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी राज्य कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध भागातून आलेल्या कर्मचाऱ्यांना संघटनेची अति महत्त्वाची पदे वाटप करण्यात आली. या मध्ये श्री. विवेक पोहेकर :- राज्याध्यक्ष ,
श्री पंढरीनाथ मर्ढेकर अध्यक्ष , श्री संतोष राऊत उपाध्यक्ष, श्रीम, हसीना मुल्ला महिला उपाध्यक्ष,श्री नागेश एंडोली कार्याध्यक्ष, श्री वैभव मानकुमरे कोषाध्यक्ष , श्री महादेव जंगम संघटक,श्री विजय चव्हाण सल्लागार, श्री शंकर गोळे सहसचिव,श्री निवास जाधव:- प्रसिद्धीप्रमुख ,श्री राजकुमार पाटील सदस्य,श्री दीपक जाधव सदस्य ,श्री ओंकार चिकणे सदस्य ,श्री संदीप पाटील :- पुणे विभागीय अध्यक्ष,श्री शांतिनाथ धरणगुत्ते :- पुणे विभाग सचिवश्री अमोल पाटील:- अमरावती विभागअध्यक्ष,
श्री अरविंद चव्हाण मानद,सचिव,श्री संतोष पंडित :- महासचिव ,श्री दादा हिरे नाशिक विभागीय अध्यक्ष आदींची निवड आणि नियुक्तीपत्र देण्यात आली.


या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजि. नं. पी एन 5139 तालुका जावली यांच्या वतीने अध्यक्ष. संतोष भिलारे, उपाध्यक्ष. शैलेश पार्ट, महिला उपाध्यक्ष. शालन जगताप, सचिव. गुरुदत्त पार्ट, सहसचिव. दत्तात्रय जाधव, कोषाध्यक्ष. प्रकाश भोंडे, कार्याध्यक्ष. ज्ञानेश्वर मर्ढेकर, संघटक. दत्तात्रय रांजणे, सल्लागार. संजय महामूलकर, संपर्कप्रमुख. विजय पाडळे, सदस्य. दीपक पवार, सुनील शिंदे, रामचंद्र चिकने, दत्तात्रय पवार यांनी केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!