कृषीमहाराष्ट्रसातारा

जावली तालुक्यातील नाचणीचे गाव म्हणून कुसुंबीच्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर

कुसुंबी. दि. २६.प्रतिनिधी:संजय वांगडे.७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ निमित्त कुसुंबी हे नाचणीचे गाव म्हणून जाहीर करण्याचा ठराव कुसुंबी गावच्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, जेष्ठ नागरीक, गावातील सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, कार्यालयीन स्टाफ, आशासेविका, अगंणवाडी सेविका – मदतनीस, उम्मेद प्रवर्तिका, सर्व बचत- शेतकरी गटाचे व तरुण मंडळाचे पदाधिकारी अवॉर्ड संस्था,सातारा व आर एस सी डी मुंबई चे कार्यकर्ते यांच्या उपस्थित एक मुखाने मंजूर करण्यात आला.

कुसुंबी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील दुर्गम भागात 11 वाड्यावर त्या व मुख्य गावठाण मिळून ग्रामपंचायत बनले आहे गावची लोकसंख्या 1862 असून गावात मुख्य उपजीविका शेती वरती अवलंबून आहे निसर्गाच्या बदलत्या स्वरूपामुळे गावातील शेतीवरती विपरीत परिणाम होत आहेत याबद्दलच्या वातावरणात गावात शेतीमध्ये पारंपारिक नाचणी, वरी, राळे व मांजरवेल,गुरया यासारखे भात बियाणे चांगल्या प्रकारे पिकवले जाते व त्यांचे उत्पन्न घेतले जाते त्यातून नाचणी हे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते इतक्या मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या नाचणी उत्पन्नातून व्यावसायिक दृष्ट्या प्रक्रिया उद्योग महाराष्ट्र फाउंडेशन मार्गदर्शन अवॉर्ड संस्था,सातारा व आर एस सी डी मुंबई यांच्या साह्याने पंचम प्रकल्प अंतर्गत गावामध्ये होत आहे यामध्ये नाचणीचे विविध असे 40 खाद्यपदार्थ बनवले जाणार आहेत त्याचबरोबर यासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे नाचणी क्षेत्र वाढवण्यासाठी गावात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

तरी सर्व कुसुंबी ग्रामस्थ सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक संस्था अवॉर्ड संस्था,सातारा आणि आर एस सी डी यांच्या सर्वांनुमते नाचणीचे गाव-कुसुंबी गावाचे नाव जाहीर करण्यात आले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!