महाराष्ट्रराजकीयसातारा

जलमंदिर पॅलेस येथील जनता दरबारात आसगाव(पुनर्वसित) ता.जि. सातारा गावचा विकास कामाचा प्रश्न निकाली..

सातारा.दि.२६.आसगाव (पुनर्वसित) ता. जि. सातारा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सौ.सुनंदा रामदास शिंदे, उपसरपंच श्री बाजीराव बबन शिंदे व नवनिर्वाचित सदस्य हर्षल शिंदे, हिरालाल शिंदे, रेश्मा शिंदे,आशा शिंदे,लता शिंदे, प्रभा कांबळे, यांनी गावच्या विकास कामासंदर्भात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

आसगाव गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले तसेच आसगाव गावाच्या विकास कामासंदर्भात मी कुठेही कमी पडणार नाही व आसगाव ग्रामपंचायतीस माझे कायम सहकार्य व मार्गदर्शन राहील असे आश्वासन दिले.

यावेळी शिव साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै. बंडाभाऊ जाधव, शौर्यावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मयूरदादा कांबळे,आसगाव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अजित शिंदे, रामदास शिंदे,शरद शिंदे,अतुल शिंदे,अनिल कांबळे व तसेच आसगाव ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!