
कुसुंबी प्रतिनिधी:संजय वांगडे
कुसुंबी.दि.०२.प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी ता. जावली हे सामान्य जनतेसाठी एक वरदानच ठरत आहे अशी प्रतिदक्रिया सामान्य लोकांकडून येत आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, ताप, खोकला असे भरपूर रुग्ण आहेत अशा रुग्णांना योग्य उपचार देऊन रुग्ण आरोग्य केंद्रात जाऊन पूर्ण बरा होत आहे. कोरोनाच्या काळात लोकांकडे काम धंदा नसल्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे अशा परिस्थितीत पेशंट जर खाजगी दवाखान्यात गेला तर तो खर्च सामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखा नाही म्हणून रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातच येण्याचा निर्णय घेते असत.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंदराव पाटील हे आपले काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन प्रामाणिकपणे आरोग्यसेवा पुरवली जात आहे वेळोवेळी लसीकरण, गरोदर माता तपासणी शिबिर, तसेच भागातील लोकांना योग्य औषध पुरवठा करत आहेत या सर्व गोष्टी वेळच्यावेळी केल्यामुळे तालुक्यातील आरोग्य केंद्राची प्रशंसा केली जात आहे.
सामान्य जनतेकडून डॉक्टर आनंदराव पाटील हे रुग्णांसाठी एक देवदूतच आहेत असे संबोधले जात आहेत.श्री काळेश्वरी देवीची यात्रा ०९ फेब्रुवारी ला असून डॉ.आनंदराव पाटील व डॉ. ऐश्वर्या निकम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कुसुंबीच्या गावासह आजूबाजूच्या भागातील लोकांच्या आरोग्य सेवेकडे जातीने लक्ष घातले आहे. डॉ.आनंदराव पाटील यांना काम करत असताना आरोग्य सेविका,आरोग्य सेवक, सुपरवायझर,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,फार्मासिस्ट, गटप्रवर्तक,वाहन चालक,लॅबअसिस्टंट,परिचारक,परिचारिका यांचे मोलाचे सहकार्य लाभते.



