महाराष्ट्रसातारासामाजिक

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या खातेदारांचे व्यवहार होणार ऑनलाईन : अध्यक्ष विक्रम भिलारे

पांचगणी.दि.२५ भारत सरकारच्या डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई नगरीत मुख्यालय असलेल्या व 24 शाखांच्या माध्यमातून विविध स्वरुपाच्या बँकिंग सुविधा प्रदान करणाऱ्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या स्वत:चे Branding असलेला QR Code कार्यान्वित करण्याचा व ग्राहकांना QR Code Kit वितरण करण्याचा कार्यक्रम बँकेच्या मुंबई तेथील मुख्यालयात बँकेचे अध्यक्ष विक्रमजी भिलारे , उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी साहेब यांचे हस्ते पार पडला.

या प्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक चंद्रकांत गावडे, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश मस्कर, अरुण सुर्वे, अजित कळंबे, आणि विद्यमान संचालक तसेच माजी अध्यक्ष राजाराम ओंबळे, माजी उपाध्यक्ष राजेंद्र कळंबे, भानुदास जाधव, हणंमत पवार, माजी संचालक मोहनराव मानकुमरे, भगवानराव धनावडे, विश्वनाथ कांबळे, शांताराम आंग्रे, उन्नती फायनान्सचे संस्थापक हनुमंत राजंणे, उद्योजक के. के. शेलार, शिवाजी रांजणे , श्रीरंग जवळ, एकनाथ पवार, बँकेचे माजी व्यवस्थापक अनिल देशमुख, खातेदार पंकज जोशी, सी.ए.श्री कन्हैय्या शा . बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास ललवाणी, अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच बँकेचे विविध शाखेतील खातेदार, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

आर्थिक दृष्या सक्षम असलेल्या व 1300 कोटीपेक्षा अधिक संमिश्र व्यवसाय असलेल्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेचे सन 2022 2023 हे ” सुवर्ण महोत्सवी “वर्ष असल्याने आपल्या ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने बँकेने माहिती तंत्रज्ञानावर सर्वाधिक भर देऊन आधुनिकतेचा स्विकार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या ग्राहकांना राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच शेड्युल्ड बँकांप्रमाणेच सेवा सुविधा प्रदान करणेसाठी तसेच बँकेच्या व्यवसाय वृध्दिकरीता या सेवेचा उपयोग होणार आहे. बँकेने या पुर्वी मोबाईल बँकिग तसेच UPI अंतर्गत विविध चॅनलच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा आपल्या ग्राहकांना प्रदान केलेली आहे. त्यामुळे सध्याच्या Digital Banking च्या युगात दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेने स्वत:चे Branding असलेला QR Code कार्यान्वित केल्यामुळे किरकोळ व्यावसायिक व Counter Sell करणाऱ्या ग्राहकांना व खातेदारांना त्याचा चांगला उपयोग होणार आहे.

मुंबई : कोड कार्यान्वित करताना विक्रम भिलारे शेजारी चंद्रकांत दळवी, चंद्रकांत गावडे व इतर ( रविकांत बेलोशे

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!