क्रीडामहाराष्ट्रसातारा

बाबाराजे केसरी २०२३ कुस्त्यांच्या महासंग्रामाचे ५ एप्रिल रोजी आयोजन


स्टार ११ महाराष्ट्र न्युज —- युवराज धुमाळ

मेढा.दि.०४.जावली तालुक्यातील करंजे तर्फ (मेढा) तालुका जावली येथे ऐतिहासिक कुस्तीच्या मैदानी खेळाला चालना देण्यासाठी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे मित्र समूह व छत्रपती शासन यांच्या वतीने बुधवार दिनांक ०५ एप्रिल२०२३ रोजी बाबाराजे केसरी २०२३ भव्य कुस्त्यांच्या महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कुस्तीच्या मैदानासाठी खास प्रमुख पाहुणे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंदजी देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र संघटन महा मंत्री),मा. जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे,शरद भाऊ मोहोळ (हिंदू शोर्य पुरस्कार विजेते), धनंजय जी जाधव (अध्यक्ष भाजपा बेळगाव ग्रामीण), ह.भ.प.प्रविण महाराज शेलार उपस्थित राहणार असल्याची माहिती छत्रपती शासनचे संस्थापक शाम धनावडे यांनी दिली.

या मैदानातील प्रमुख कुस्ती प्रथम क्रमांकाची मानाची कुस्ती महाराष्ट्राचा लाडका मल्ल महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान शिवराज राक्षे,इराणचे पैलवान अली राणी यांच्यात डोळ्याचे पारणे फेडणारी लढत होणार असून कुस्तीचे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकते ते पाहण्यासाठी तसेच इतरही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंचे कुस्ती कौशल्य पाहण्याची संधी सोडू नये,यासाठी सातारा जिल्ह्यातील कुस्ती प्रेमी तसेच जावली तालुक्यातील तमाम जनतेला या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाजसेवक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री.ज्ञानदेव रांजणे यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!