स्टार ११महाराष्ट्र न्युज — युवराज धुमाळ
मेढा. दि.०८ संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाने जोरदार पक्ष बांधणीस सुरुवात केली आहे.दस्तुरखुद्द विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष दिले असून या आठवड्यात त्यांचा सातारा जिल्ह्यात दुसरा दौरा होत असून या दौऱ्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात मेढा येथे रविवारी 4 वा. मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात अजित पवार यांचे कट्टरसमर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी अर्थ-शिक्षण सभापती अमितदादा कदम यांचा दादांच्या उपस्थित राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी दिली.
माजी आमदार जी. जी. आण्णा कदम यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अर्थ शिक्षण समिती सभापती अमित दादा कदम यांचा या मेळाव्यात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होणार आहे. अमित कदम यांच्या प्रवेशामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मोठी मदत मिळणार आहे .राजकीय प्रवाहात काम करताना अमित कदम हे अजित दादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांचा पक्षातील प्रवेश पक्षास बळकटी देणारा ठरणार आहे. विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष दिले असून, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मूळची ताकद आहे. या मतदारसंघातील शेतकरी, जेष्ठ कार्यकर्त्यांची आजही शरद पवार साहेब ,अजितदादा पवार यांच्याशी नाळ जोडलेली आहे .त्यामुळे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या अमित कदम यांचा प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठी बळकटी मिळेल. पक्षाने सातारा विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घातल्यामुळे अजित पवार यांच्या 9 एप्रिल च्या मेढा येथील मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री कार्यकाळात अजित पवार यांनी सातारा विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी अधिक लक्ष देऊन मतदारसंघासाठी विशेष निधीची तरतूद केली होती. त्यामुळे सातारा -जावळी विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला आहे. या पुढील काळातही राष्ट्रवादीची या मतदारसंघातील ताकद वाढावी कार्यकर्त्यांना बळ मिळावे या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण असून या मेळाव्यासाठी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी, महिला पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.




