Uncategorized

जावली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज — युवराज धुमाळ

केळघर. दि.०८जावली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सोमवार दि. १० एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२३ अखेर ४ दिवस काम बंद आंदोलन करून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत.


ग्रामपंचायत कर्मचारी तळागाळापर्यत जाऊन काम करतो.ग्रामपंचायतील मधील छोट्या मोठया कार्यक्रमात सकाळ पासून संध्याकाळ पर्यत काम करणारा हा कर्मचारीआहे.सर्वात जास्त तो काम करतो तसेच ग्रामसेवकांचेही बरीच कामे सुध्दा हे कर्मचारी करतात.महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना मा.अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार नगरपरिषद,नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी.या सह इतर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सोमवार दि. १० एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२३ अखेर ४ दिवस काम बंद आंदोलन करून सर्व ग्रा.प. कर्मचारी संपावर जाणार आहेत.


महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहे. राज्य शासनाकडून सध्या किमान वेतन ५०% दिले जात आहे. या किमान वेतनावर आपला जीवनचरितार्थ चालवणे फारच अवघड होत आहे. आज पर्यंत या आर्थिक संकटाला कंटाळून काही ग्रामपंचायत कर्मचारी यानी आत्महत्या केल्या आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. राज्यातील २७९२० ग्रामपंचायती मध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असूण त्या बाबत स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जावळीच्या वतीने राज्य शासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. आमच्या मागण्या खालील प्रमाणे असून १) कलम ६१ रद्द करणे अथवा सुधारणा करणे. २) मा.अभय यावलकर समितीच्या शिफारशी जश्याच्या तश्या स्वीकारून वेतन श्रेणी लागू करणे. ३) ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या किमान वेतनासाठी उत्पन्नाची जाचक अट रद्द करणे.४) उपदान योजनेच्या जाचक अटी रद्द करणे व सरसकट सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी यांना उपदान योजनेचा लाभ मिळणेसाठी निर्णय घेणे,५) ग्रामपंचायत कर्मचारी यांना १० ऑगस्ट २०२० पासून किमान वेतन सुधारित दराने लागू असून शासनाने १ एप्रिल २०२२ पासून लागू केले आहे. यातील २० महिन्याचा फरक मिळावा.६) ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह खाते कामगार भविष्य निर्वाह निधी संघटना (इ.पी.एफ. ) या कार्यालाकडे वर्ग करणेसाठी धोरणात्मक निर्णय घेणे. ७) ग्रामपंचायत कर्मचारी यांचेसाठी आकृतिबंध सुधारणा करणे.८) २०२३ ला होणारी मेगा भरतीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मधून जिल्हा परिषद
भरतीसाठी वर्ग इ ची पद भरणेस मान्यता देणे. ९) जिल्हा परिषद सेवेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मधून वर्ग ३५ तात्काळ भरती करणेसाठी मान्यता मिळणे बाबत तसेच आमच्या वरील सर्व मागण्या शासनाने मान्य करण्यासाठी निवेदन देण्यात आल्याचे स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जावळीचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ मर्ढेकर यांनी सांगितले.

या सर्व मागण्यासंदर्भात शासनाने लवकरच निर्णय घ्यावा अन्यथा १० एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत आपले ग्रामपंचायतीचे ४ दिवस काम बंद ठेवून ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत कर्मचारी संपावर जाणार आहे.या मागण्याबाबत लवकरात लवकर शासनस्तरावर निर्णय होणे आवश्यक आहे. तरी यासाठी ग्रामपंचायती कडून ग्रामपंचायत कर्मचारी यांना राज्य शासनाकडून नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी यांचे प्रमाणे वेतन श्रेणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करून तशी मागणी राज्य शासनाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपचायत कर्मचारी संघटना.सर्व कर्मचारी वर्ग संपावर जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जावळीचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ मर्ढेकर, तालुका अध्यक्ष संतोष भिलारे, उपाध्यक्ष शैलेश पार्टे,सचिव ज्ञानेश्वर जाधव, महिला अध्यक्ष शालन जगताप यांच्या सह सर्व कर्मचारी यांनी दिली.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!