महाराष्ट्रसातारासामाजिक

मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये गुणवत्ता व आरक्षणनिहाय प्रवेश

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —

सातारा दि. 19: जिल्हयातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये गुणवत्ता व आरक्षणनिहाय प्रवेश देण्यात येणार आहे. सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 8 ते 10 वी , 11 वी व प्रथम वर्ष पदवी , पदव्युत्तर व व्यावसायीक पदवी अभ्यासक्रमासाठी वसतिगृहातील रिक्त जागेवरती प्रवेश दिला जाणार आहे. या वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सोईसुविधा अंतर्गत मोफत निवास व भोजन पुरविण्यात येते. तसेच शाळा , महाविद्यालयांने ठरवून दिलेले गणवेश, स्टेशनरी, क्रमिक पुस्तके व इतर साहित्यासाठी नियमानुसार देय असलेली रककम प्रवेशित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.

वसतीगृहातील प्रवेशित मुलांना खर्चासाठी रू. 500/- व मुलींना रूपये 600/- विशेष भत्यासह दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो.
जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल सादर केल्यास वसतीगृह प्रवेश अर्ज विनामूल्य मिळतील. तरी गरजू विद्यार्थी व पालकांनी वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन, सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.

00000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!