महाराष्ट्रसातारासामाजिक

सातारा जिल्हयातील धरणग्रस्ताचे कोयनामाईला साकडे

स्टार ११ महाराष्ट्र प्रतिनिधी —-

सातारा.दि.२०.सातारा जिल्हयातील धरणग्रस्ताच्या तातडीच्या आणि जिवन मरणाच्या समस्या कायमस्वरूपात सोडवून धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून होत असलेली दिरंगाई मुळे कोयनामाईला धरणग्रस्तांचे धरणातील पाण्यास साकडे घालण्यात आले.
सातारा जिल्हयातील कोयना ,उरमोडी, तारळी, वांग या धरणामुळे बाधीत झालेल्या धरणग्रस्तांचे विकसनशिल पुनर्वसन तसेच तातडीच्या आणि जिवन मरणाच्या समस्यांची सोडवणूक होणेसाठी ता.27 फेब्रुवारी 2023 पासून कोयनानगर ता.पाटण व बामणोली ता.जावली जि. सातारा या ठिकाणी धरणग्रस्तांचे बेमुदत अंदोलन सुरू होते.

अंदोलन दरम्यान दि. 27/03/2023 रोजी धरणग्रस्ताच्या मागण्या मान्य होण्यासाठी शासन स्तरावर मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांचे सोबत 1 महिण्यात बैठक आयोजित करण्याबाबत मा.ना.शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा जिल्हा यांनी डॉ.भारत पाटणकर अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक श्रमीक मुक्ती दल यांना पत्र दिले. त्यानुसार धरणग्रस्तांनी अंदोलन मागे घेतले होते. परंतु धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत अद्याप अखेर बैठक न झाल्यामुळे नाईलाजाने जिल्हयातील कोयना, उरमोडी, तारळी व वांग धरणग्रस्त मोठया संख्येने कोयना नदी, त्रिवेणी संगम, मजरे शेंबडी ता.तावली येथे कोयना नदीचे ओटी भरण्यात आली, शपतविधी घेण्यात आला तसेच त्रिवेणी संगम येथील संगमेश्वर महादेव मंदीराची देखील पुजा करण्यात आली. व साकडे घालण्यात आले की पिडीत प्रकल्पग्रस्ताना लवकरात लवकर न्याय मिळवा.

तसेच या अनोकख्या अंदोलन प्रकाश देवजी साळुखे, कोयना धरणग्रस्त संघटना अध्यक्ष ता. जावली, महाबळेश्वर, यांच्या नेतृत्वाखाली कोयनामाईला साकडे घालण्यात आले. त्यावेळी जावली महाबळेश्वर तालुक्यामधील धरणग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.

“श्रमीक मुक्ती दलाचे अध्यक्ष याच्या अध्यक्षतेखाली हे पुजनाचा कार्यक्रम करण्यात आला. कोयनेतील धरणग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.भारत पाटणकर यांच्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभाग घेवू, त्रिवेणी संगम येथे कोयनामाईचे खना नारळाने ओटी भरण्यात आली व कोयना धरणग्रस्ताना लवकरात लवकर न्याय मिळवून दे असे साकडे कोयनामाईला यावेळी घालण्यात आले.

प्रकाश देवजी साळुंखे, अध्यक्ष
धरणग्रस्त संघटना तालुका जावली, महाबळेश्वर

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!