
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
मेढा प्रतिनिधी. दि.२८. जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर असलेल्या तीर्थक्षेत्र करहर ते आंबेघर दरम्यान असणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. पुलावरील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. या पुलावरूनच पांचगणी ते कुडाळ एस टी वाहतुक दिवसातुन सारखी सुरु असतें.
दरवर्षी आषाढी एकादशीला करहर येथे वैष्णवांचा मेळा भरतो, तसेच या पुलावरून वाहने व शेतकरी प्रवासी यांची रहदारी खुप असते आषाढी एकादशी एक दिवसावर आली असताना सार्वजनीक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष झालेले पहावयास मिळत आहे सदर बाबीमुळे आषाढी एकादशीला पुलावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
करहर येथील परमत्मा पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. आषाढी एकादशी दिवशी कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत उपाय योजना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जावळी तालुका प्रमुख श्रीहरी गोळे यांनी केली आहे.



