स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ———
मेढा. दि.१३ . जियो कंपनी ग्राहकांना प्रामाणिक सेवा देत आहे. कंपनीने ग्राहकांना आपल्याला आवडेल असा प्लॅन नुकताच बाजारपेठेत उपलब्ध केला असून या नवीन ,”जियो भारत” सेवेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन प्रणब रोहित सातारा जिल्हा जियो सेंटर मॅनेजर यांनी केले आहे.
मेढा येथील जियो डिजिटल लाईफ सेंटर येथे नव्याने उपलब्ध झालेल्या जियो भारत” या योजनेचा ९९९ रुपयात मोबाईल योजना तसेच १ महिना फकत १२३ रुपयाचा रिचार्ज मारून unlimited कॉलिंग सह १४ gb net या सेवेचा शुभारंभ येथील ग्रामस्थ श्री गणेश उत्तम वंजारी यांच्या पासून करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे शाखाप्रमुख संताजी गायकवाड, चित्रा शिंदे,जावली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अभिजित शिंगटे,तसेच मेढा जियो डिजिटल लाईफ चे कर्मचारी अक्षय सावंत, आदीराज इंगवले,गणेश पाटणे,उपस्थित होते.
या वेळी बोलताना त्यांनी विविध जियो प्लॅन बाबत माहिती दिली.यामध्ये जियो ग्राहकाना जियो प्लस पोस्टपेड प्लॅन १ महिन्या करीता ट्रायल स्वरूपात मिळणार असून या मुळे कुटुंबामध्ये असणारे किमान चार व्यक्ती याचा लाभ मिळवणार असून या करीता रुपये ३९९, मध्ये ७५gb data ,प्रत्येकी रुपये ९९ मध्ये ३अतिरिक्त सिम आपल्या कुटुंब सोबत एकत्रितपणे वापरण्याची संधी मिळणार असल्याचे सूचित केले.
यावेळी उपस्थित चित्रा शिंदे यांनी जियो कंपनी ग्राहकांना चांगली सेवा सुविधा देत असून ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या जियो भारत योजने चा लाभ घेण्यासाठी अक्षय सावंत ९३५६९४१७०५, आदिराज इंगवले ९३७३८२६१०० यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ही जिल्हा जियो सेंटर मॅनेजर प्रणब रोहित यांनी केले आहे.