
स्टार 11 महाराष्ट्र न्यूज ————
सातारा दि. 12 (जि.मा.का) . जिल्हयातील युवक-युवतींना उद्योगांच्या मागणीवर आधारित (Demand Driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दि. 1 ते 31 जुलै 2023 दरम्यान कौशल्याची मागणी सर्वेक्षण आणि उद्योगांची कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी (Mapping of skill requirement in manpower of Industries) मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मोठे उद्योग कार्यान्वित आहेत. उद्योग आणि निर्मिती क्षेत्र,सेवा क्षेत्र, आरोग्य सेवा यासारख्या उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकरच्या काम निहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल. प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणामध्ये वृध्दी होतील..
जिल्हयातील सर्व उद्योजकांनी https:/tinurl.com/IndustrySkillRequirement या google Link द्वारे आपल्या क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारी मनुष्यबळाची गरज मागणी नोंदवावी. त्यामुळे जिल्हयास आवश्यक असणारी मनुष्यबळाची गरज लक्षात येईल तसेच जिल्हयातील कौशल्य कमतरतेचा (Skill Gap) अभ्यास करणे सोयीचे होईल. याबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत तळ मजला, सातारा 8308383637/7738702522 यांचेशी संपर्क साधवा,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
00000