स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मेढा.दि.२२ छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आधी लगीन कोंडाण्याचे म्हणणारे तानाजी मालुसरे , तोफेचे आवाज येई पर्यंत शत्रुवर तुटून पडणारे बाजीप्रभु देशपांडे आणि स्वतःचा जीव जाणार आहे असे माहीत असताना शत्रुच्या छावणीत घुसणारे शिवा काशिद यासारखे असंख्य मावळे आपल्याला इतिसामध्ये पहायला मिळतात . परंतु त्याच शिवरांच्या किल्यांवर जावुन स्वतःच्या नावाचे झेंडे लावणारे आणि पाटर्या करणारे तरुण आज पहायला मिळतात . या तरुणांना शिवजयंती आठवते परंतु छ. शिवाजी महाराजांचे विचारांचे विस्मरण झाले आहे. त्यांच्या विचारांचा विसर पडला असल्याचे शिव चरित्र व्याख्याते सागर पवार यांनी सांगीतले.
जय हिंद फाऊंडेशन,जावली व पत्रकार संघ जावली यांचे संयुक्त विद्यमाने सायगाव ता.जावली येथे लोहिया विद्यालयात शिवजयंतीनिमित्त “छ.शिवरायांचे शूर मावळे” या विषयावर व्याख्याते ह.भ.प श्री.सागर पवार बोलत होते. यावेळी जयहिंद फॉउंडेशनचे राष्ट्रीय सचिव मेजर सुभेदार हनुमंत चिकने,भुईज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, सामाजिक कार्यकर्ते अजित आपटे, जेष्ठ पत्रकार नारायण शिंगटे,मा.नायब तहसिलदार विनायक आढाव,प्राचार्य सौ.स्मिता माने ,जावली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किशोरजी बोराटे जावली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पवार, जयहिंद फॉउंडेशनचे सदस्य सुलभा लोखंडे, अनुकूल चिकाटे, सुवर्णाताई जाधव, सायगावच्या माजी उपसरपंच सौ साधना कदम, पत्रकार भास्कर धनावड़े, पत्रकार सोमनाथ साखरे, पत्रकार सुहास भोसले , पत्रकार मोहन जगताप , बापु वाघ आदि मान्यवर उपस्थित होते .

यावेळी बोलताना पवार म्हणाले छ. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना शिवरायांचा मावळा म्हणून तरुण वर्ग दिसत असला तरी आज प्रत्यक्षात महाराजांचे विचार या तरुणांमध्ये पहावयास मिळत नाहीत . आजचा तरुण हा व्यसनाधिन मध्ये अडकताना पहावयास मिळत आहे.
ज्या मावळ्यांने स्वतःच्या जिवाचे बलीदान देवुन किल्ले जिंकले त्या किल्यांवर पार्ट्या करताना तरुण दिसत आहे. त्या किल्यांवर स्वतःच्या नावाची रंगोटी करून परिसर अस्वच्छ करित आहे हे कितपत योग्य आहे असेही त्यांनी सांगितले . तरुणांनो ज्या दिवशी आपल्यात सुधारणा होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही शिवरायांचे मावळे व्हाल असे पवार यांनी सांगुन व्यसनापासुन मुक्त व्हा असे आवाहन सागर पवार यांनी केले.
यावेळी सपोनि अशिष कांबळे, सपोनि अमोल माने, जेष्ठ पत्रकार नारायण शिंगटे, अजित आपटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापिका सौ. स्मिता माने यांनी केले. यावेळी विविध शाळांमधुन विद्यार्थी , शिक्षक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.



