महाराष्ट्रसातारासामाजिक

वनवा विझवून लाखों वन्यजिव वाचवल्याबद्दल जावलीकरांचे वतीने तहसिलदार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव

मेढा. दि.२६ जावलीच्या कर्तव्यदक्ष तहसिदार पोळ यांच्या सतर्कतेमुळे वनवा विझवून लाखों वन्यजिव वाचवल्याबद्दल जावलीकरांचे वतीने तहसिलदार व मित्र मेळ्याच्या पदाधिकाऱ्यांवर सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

तहसिलदार राजेंद्र पोळ हे सकाळी ११ च्या दरम्यान स्थळ पाहणी करण्यासाठी मेढा मार्गे कुडाळ ला जात असताना मालदेव खिंडीमध्ये मेन डोंगर परिसरात वणवा लागल्याचे दिसून आला त्या क्षणी ड्रायव्हर ज्ञानेश्वर बेलोश यांना गाडी बाजूला घ्या असे सांगून गाडीतून  खाली उतरून स्वतः लागलेला वणवच्या दिशेने जावून वणवा विझवण्याचे काम करू लागले. व तात्काळ कर्मचाऱ्याना बोलावून वणवा विझवला.त्यांच्या मदतीला जावली मित्रमेळा फाउंडेशन चे पदाधिकारी प्रविण पवार, अमित लकेरी,निलेश घनावडे,व समाजसेविका उषा उंबरकर इ.व तहसिल ऑफिस मधील कर्मचारी यांनी वणवा विझवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!