
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि.०१. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज जावली तालुका यांच्यावतीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे जोपर्यंत निवडुन दिलेल्या आमदार, खासदार यांच्या निवास स्थाना समोर धरणे आंदोलन होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर व जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या आदेशानुसार जावली तालुक्यातील उपोषणासाठी बसलेल्या मराठा बंधवास वंचित बहुजन आघाडी जावली तालुक्याचे वतीने आम्ही पाठींबा देत आहोत मराठा बांधव ज्या भुमिका घेतील त्यास आम्ही समर्थन देत आहोत अशा आशयाचे पत्र मेढा येथे उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांस अध्यक्ष प्रताप सपकाळ, उपाध्यक्ष सिद्धार्थ जगताप सचिव योगेश कांबळे व सहकाऱ्यांनी दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जावली तालुका अध्यक्ष प्रताप सपकाळ, उपाध्यक्ष सिदार्थ जगताप, सचिव योगेश कांबळे,आनंदा परिहार,मोहन खरात,सिताराम कांबळे,रमेश गाडे,उपस्थीत होते.
सकल मराठा समाज जावली तालुका यांच्यावतीने सचिन करंजेकर,प्रकाश कदम,बजरंग चौधरी,राम कदम,निलेश चिकणे जितेंद्र वेंदे यांनी साखळी उपोषणाला व मराठा आरक्षण बाबत पाठींबा दिलेबद्दल वंचित बहुजन आघाडी जावली यांचे आभार मानले.