महाराष्ट्रसातारासामाजिक

आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बोंडारवाडी धरण कृती समितीचा रविवारी मेळावा

 

स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क

केळघर दि.२४ जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने,२५नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका घेऊन वाढीव क्षमतेच्या बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचेआश्वासन दिले होते.मात्र ३ महिन्यानंतरही प्रशासनाकडून प्रस्तावाबाबत कार्यवाही झालेली नसल्याने ५४ गावांमधे प्रचंड नाराजी आहे.


मेढा केळघर विभागातील ५४ गावे गेल्या ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. हक्काचे पाणी मिळण्यासाठी बोंडारवाडी धरण कृती समिती धरण पूर्ण करण्यासाठी,श्रमिक मुक्ती दल चळवळीचे नेतृत्व व समन्यायी पाणी वाटप चळवळीचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतत्त्वाखाली, या बैठकीत झालेले निर्णय लोकांना समजावेत व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी केळघर (नांदगणे) येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर मार्गदर्शन करणार आहेत. पाणी नसल्याने मेढा केळघर भागाची झालेली दैन्यावस्था व बोंडारवाडी धरणाची आवश्यकता महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी, ५४ गावातील नागरिक, ग्रामस्थ यांनी येत्या रविवारी दि.२७ फेब्रुवारी रोजी केळघर नांदगणे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात ५४ गावातील नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी बहुसंख्येने या मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!