महाराष्ट्रसातारासामाजिक

नांदगणे येथील विविध विकासकामांच्या भुमिपूजन व उद्घाटन

स्टार ११महाराष्ट्र न्युज नेटवर्क
केळघर. दि.२३ जावली तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर विकासाची गंगा पोहचवण्यासाठी कटीबद्ध असुन नांदगणे गाव हे कायमच माझ्या पाठीशी आहे . भविष्यातही या गावच्या विकासासाठी कटीबद्ध असुन उर्वरीत कामेही लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली .
नांदगणे ता जावली येथील विविध  विकासकामांच्या भुमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
  यावेळी नांदगणेचे सरपंच रविंद्र कारंजकर उपसरपंच जगन्नाथ दळवी , माजी . सरपंच पांडुरंग दळवी , सुनिता दळवी, नारायण दळवी , मनिषा खाडे, मारुती दळवी, सुशिला शेलार, रसिला शिंदे ,गणपत दळवी, सुनिल दळवी, शांताराम बेलोशे , पांडुरंग कृष्णा दळवी , सिताराम शेलार , संतोष दळवी , मारती लोखंडे , राजु लोखंडे, ज्ञानेश्वर दळवी , नारायण खाडे, तुषार पंडित , रघुनाथ दळवी ‘ ‘सागर धनावडे , सुनिल जांभळे यांचेसह युवक , ग्रामस्थ , महिला उपस्थित होत्या .
 यावेळी आ शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत केळघर परिसरात शेतीचे फार मोठे नुकसान झाले असुन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा बॅकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून आणि नाम फौंडेशन व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  परिसरातील अनेक गावात जेसीबी फॉकलॉन सारख्या मशनरिच्या सहाय्याने कामे चालु असुन लवकरच नांदगणे येथीलही शेतीदुरुस्तीचे काम चालु होईल . अतिवृष्टीमुळे बाधित झालेली एकही शेतजमीन नादुरुस्त ठेवली जाणार नाही प्रत्येक शेतकऱ्याची जमीन दुरुस्त केली जाईल अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी दिली .

Vidya Dhumal

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!