
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा.दि.१४. लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या निर्देश सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी यांच्या बदलांबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २२ पोट कलम २ अन्वये जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, व २० पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी बदल्या केल्या आहेत .
यामध्ये प्रामुख्याने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील फडतरे यांची सायबर पोलीस ठाणे ,विश्वजीत घोडके यांची सातारा तालुका पोलीस ठाणे येथून वाचक पोलीस अधीक्षक येथे बदली तर वाई पोलीस ठाण्याचे बाळू भरणे यांची प्रभारी जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.अशा दहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हात बदल्या केल्या आहेत.
त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले वाहतूक नियंत्रण शाखा कराड शहर यांची मल्हारपेठ पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.तळबीड पोलीस ठाण्याचे राहुल वरोटे यांची पाटण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अशा १४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहेत.
तर २० पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या पोलिस अधीक्षक यांनी केले आहेत. जिल्ह्यातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कोठे बदल्या झाल्या आहेत पुढील प्रमाणे.