निवडणूक आयोगसातारा

मेढा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत

स्टार ११ महाराष्ट्र


मेढा. दि.२. मेढा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक,निष्पक्ष व भितीमुक्त वातावरणात पार पडली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हनमंत कोळेकर यांनी दिली.


जिल्हाधिकारी संतोष पाटील,निवडणूक निरीक्षक सतीश राउत यांनी निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका व्हाव्यात यासाठी मेढा येथील मतदान केंद्रावर स्वत पाहणी करत आढावा घेतला.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत कोळेकर,सहा.निवडणूक अधिकारी अजिंक्य पाटील,नायब तहसीलदार सुनील मुनाळे उपस्तीथ होते.


या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी एकून तीन उमेदवार तर ३९नगरसेवक पदासाठी एकूण ३३९१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून जिल्ह्यात ८४.२३ टक्के उच्चांक मतदान करत प्रकिया पार पडली आहे. हि प्रकिया बऱ्याच कालावधीनंतर होत असल्याने मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्व प्रशासाकीय यंत्रणा सज्ज झाली होती कोणताही उनुचीत प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी मतदारांसोबत सर्थीचे प्रयत्न करत असताना दिसून येत होते.


मतदारांचा कल कुणाकडे असणार हे ३ डिसेंबरला कळणार होते पण,विजयाचा कल पुढे ढकलल्याने कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!