राजकीयसातारा

 जावली तालुका भाजपाच्या वतीने मेढा येथे जोडे मारो आंदोलन

स्टार ११ महाराष्ट्र


मेढा. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून क्रूर मोगली शासक औरंगजेब याच उद्धतिकरण केल्याबद्दल भाजपा जावली तालुका यांच्या वतीने समाजवादी पक्षाचे आमदार आबू असीम आजमी यांच्या प्रतिमेला मेढा तालुका जावली येथे जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.


कालच विधानसभेत आमदार आबू आजमी यांनी छत्रपती शिवरायांपेक्षा औरंगजेब मोठा होता आशा स्वरूपाचं वक्तव्य केले होते. त्याच्या निषेध करण्यासाठी तसेच आमदार आबू आजमी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांना तहसील कार्यालय मेढा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.


वर्तमान भारत देशाला मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज आशा अनेक आक्रमकांच्या कडून झालेल्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक अत्याचारांचा कटू इतिहास आहे. अशा परकीय विकृत अत्याचाऱ्यांच्या आक्रमनाला तोंड देऊन स्वतंत्र भारत देशाची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातील साधू संत, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहे. असे असताना महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचं काम समाजवादी पक्षाचा आमदार आबू आजमी सारखे लोक करत आहेत.

औरंगजेब, टिपू सुलतान सारख्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या क्रूर विकृत शासकाचे व्हिडीओ, स्टेट्स ठेवणे, त्यांच्याविषयीं गोडवे गाणे व तत्सम प्रकारे उदात्तीकरण करून बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना दुखावन्याच काम जाणूनबुजून आबू अझमी करत आहे. अशा व्यक्तीला महाराष्टाच्या पवित्र अशा विधानसभेत सदस्य म्हणून राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तरी आमदार आबू आजमी यांचे तात्काळ निलंबन करून, महाराष्ट्रात हिंदू हत्याकांड घडवणाऱ्या औरंगजेब, टिपू सुलतान सारख्यांचे उदात्तीकरण करणे कायद्याच्या दृष्टीने दखलपात्र गुन्हा ठरवा असा कायदा विधिमंडळात पारित व्हावा ही मागणी भाजपा जावली यांचे वतीने करण्यात आली.


यावेळी मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आबू आजमी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.आबू आजमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.


भाजपा जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, मेढा शहर अध्यक्ष संजय सपकाळ, तालुका उपाध्यक्ष अंकुश बेलोशे, दत्ता शिंदे,सरचिटणीस नितिन गावडे,मारुती चिकणे, बाजार समिती संचालक हनुमंत शिंगटे, नगरसेवक विकास देशपांडे, प्रवीण गाडवे, दत्तात्रय किर्दत,दत्तात्रय गुजर, मनीष गोळे, शिवाजी गोरे, शिवाजी देशमुख राजेश काकडे, प्रकाश गोळे, सुरेश सणस व विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!