केळघर / युवराज धुमाळ
केळघर. दि.१२ भारतीय सैन्यदलात
गेले सतरा वर्षे देशसेवा करून आपल्या मायभुमीत परतलेल्या भुमिपुत्राचा तापोळा येथील ग्रामस्थ , व्यापारी मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ , दुर्गामाता महिला मंडळ , राजा छत्रपती मंडळ तापोळा यांचेवतीने तापोळा येथील श्री संतोष रमेश चव्हाण या जवानाची तापोळावासियांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात व उत्साहात अनोख्या पद्धतीने मिरवणुक काढुन संतोष चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या यामुळे ग्रामीण भागातील अनेक युवक युवती खऱ्या अर्थाने देशसेवेसाठी पुढे येतील .
तापोळा येथील श्री संतोष रमेश चव्हाण प्रतीकुल परस्थितीत शिक्षण पूर्ण करून घरची परस्थिती हालाखीची असताना सुद्धा आई वडिलांनी मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणावर भर दिला ” पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलौकी झेंडा ” या वुक्तीप्रमाणे आई उषा व वडिल रमेश चव्हाण यांनी मोलमजुरी करूनआपली मुले मोठी व्हावी म्हणुन खुप काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
सतरा वर्षापुर्वी आर्मीत भरती झालेल्या जवान श्री संतोष चव्हाण देवळाली कॅम्प नाशिक येथे ट्रेनिंग पूर्ण करून वन झिरो वन मराठा बटालियन विभागात जम्मू ( पुंछ ) सिकंदराबाद , उधमपुर , फरीदकोट ( पंजाब ) मेंढर ( जम्मु ) येथे देशसेवा केली.
सतरा वर्षे देशसेवा करून परतलेल्या जवान श्री संतोष चव्हाण यांचे तापोळा येथे आपल्या जन्मभुमीत मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले .सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त जवान श्री संतोष चव्हाण म्हणाले खडतर परिस्थितीवर मात करून देशसेवेची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे या कार्यकाळात मिळालेल्या अनुभवातुन बरेच काही शिकता आले यातील त्यांनी एक घडलेली घटना कथन केली जेवन करत असताना अचानक त्यांच्या समोर ग्रेनाईट (बाँम्ब ) येऊन पडला परंतु नशीब बलवान होते की तो बॉम्ब फुटला नाही असे बरेच प्रसंग त्यांच्या सतरा वर्षाच्या सेवेत आले परंतु एवढे होवुन सुद्धा त्यांच्या मनात एकच ध्यास देशसेवेचा होता त्याच जोशात घर व कुटुंबापेक्षा देशसेवा त्याना करता आली याचा सार्थ अभिमान असल्याचा त्यांनी सांगितले यापुढेही देशसेवेसाठी सीमेवर जावुन देशाच्या रक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना निश्चितच मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी धोंडीबा धनावडे , दिपक धनावडे , शिवाजी भोसले , तुकाराम धनावडे, आनंद धनावडे (सरपंच) प्रकाश पडगे , विठ्ठल धनावडे , गणेश उतेकर,मोहन भोसले, कोंडीबा शेलार, विश्वास साळुंखे, विशाल सपकाळ , गणेश भोसले , मारुती भोपळे , विजय झरेकर , शुभम कदम, राजु धनावडे , संतोष धनावडे, योगेश कारंडे, मंगेश धनावडे, किसन चव्हाण , तानाजी चहाण, धनाजी चव्हाण, संतोष मालुसरे , सुभाष शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले तर सनराईझर्स इंग्लीश मिडियम , जि . प .प्रा . शाळा, इलाबेन मेहता विद्यालय भाग शाळा तापोळा यांनी देश भक्तीपर कार्यक्रम सादर करून निवृत्त जवानश्री संतोष चव्हाण, प्रविण जाधव , जालिंदर जाधव ,यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी श्री संतोष चव्हाण यांचे स्वागतासाठी तापोळा , तळदेव सह परिसरातील अनेक गावातील महिला , पुरुष , कुटुंबियांसह तरुणवर्ग नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
फोटो : तापोळा येथे सेवानिवृत्त जवान संतोष चव्हाण यांचे भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले छाया : नारायण जाधव .



