जावलीतील अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची येत्या सोमवार पासुन दुरुस्ती आ.भोसले यांचा शेतकऱ्यांना दिलासा
केळघर. दि.०८ अतिवृष्टीमुळे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व नुकसानीत शेतीची दुरुस्ती करून देण्यासाठी आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने नुकसानीत शेतीची दुरुस्ती नाम फाऊंडेशन च्या सहाय्याने करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीने जावली तालुक्यातील शेतकरी हा पुर्णपणे उध्वस्त झाला असून अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे कुणाचीही तक्रार येता कामा नये अशा सुचना अधिकाऱ्यांना आ.शिवेंद्रराजे यांनी केल्या आहेत.
आ.शिवेंद्रराजे भोसले,ज्ञानदेव रांजणे व नामफौंडेशनच्या माध्यमातून वाहून गेलेल्या शेतजमीनीच्या दुरुस्तीचे , विहीर पुर्नरभरनचे काम येत्या सोमवार पासून सुरू करण्यात येणार असल्याने त्याचे नियोजनासाठी आज मेढा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मेढ्याचे नगराध्ययक्ष पांडूरंग जवळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,दत्तात्रय पवार, विजय सुतार, तहसिलदार राजेंद्र पोळ,गटविकास अधिकारी रमेश काळे, नामफौंडेशनचे बाळासाहेब शिंदे व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ.शिवेद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पावसामध्ये अतिवृष्टी पुर म्हणा, ओढे नाले वाहून गेल्यामुळं नदीचा प्रवाह फार मोठा होता. अनेक ठिकाणी नदीचं पात्र बदलले गेलं आणि सगळ्या जमिनी खरवडून वाहून गेल्या. ताली गेल्या हद्द दाखवणारी जुनी झाडे गेली. बरेच दिवस झालं पंचनामे झाले शासनाकडे अनेक वेळेला याविषयी चर्चा पाठपुरावा जिल्हा पातळीवर पण करताना अडचणी येत होत्या. जिल्हा नियोजन मधून थोडीफार मदत या कामाला आता झालेली आहे . पण आता वाट बघत बसणे शक्य नाही. कारण शेतकऱ्याला उभा करायचा असेल तर शेती त्यांच्या हाताखाली आली पाहीजे.त्यांना उभे करायचे असेल तर त्यांची गाळामध्ये गेलेली जमीन आहे ती लवकरात लवकर तयार केली पाहीजे. मेढा, केळघर विभागात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून त्याबाबत तहसीलदार, कृषीविभाग, पंचायत समिती विभाग अधिकारी सर्व काही प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आपण पुढे कसं जायचं या बाबात बैठक घेऊन खाजगी ठेकेदार आहेत त्यांच्याकडून लागणारी मशीन पोकलेन असतील,जेसीबी व उपंर त्यासाठी लागणारे डिझेल आहे ते आपण उपलब्ध करतोय. काही प्रमाणात डिझेलची सुविधा जिल्हा नियोजन मधून तर काही प्रमाणात मी स्वतः, राजंणे साहेब उपलब्थ करणार आहेत. पुढच्या सोमवारपासून आपण काम द्यायचे सुरु करतोय त्यासाठी गावची माणसं अधिकारी नेमले जातील गावकऱ्यांची समिती नेमली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या देखरेखी खाली ही कामे पूर्णत्वाला नेली जातील.
संबधित विभाग जे अधिकारी तुम्ही देणार आहात त्यांनी प्रत्येक गावच्या सरपंच व समितीला अधिकार देऊन कामाचे नियोजन करा.गाळ काढण्यासाठी विहीर दुरूस्त पुर्नरभरण करता येईल.हद्दी ठरवण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे.कमीत कमी मशीन आल्यावर फक्त कामच झालचं पाहिचे. सर्व गोष्टीचा विचार करता कामाच्या अडचणी लक्षात घेऊन त्या पद्धतीने नियोजन करावे. असेही आ. शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.



