सामाजिक

सावलीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी आपल्या मानधनातून दिले गरीब मुलांना गणवेश,

 मोफत पिकविमा, महाआरोग्य शिबीर व गुणवंतांचा सकार कौतुकाचा वर्षाव

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–

मेढा, दि .३० : सावली गावचे सरपंच विजय सपकाळ उपसरपंच बाबुराव भिलारेंसह सर्व सदस्य यांनी आपल्या मानधनातून राबविलेला गरीब गरजू मुलांना शैक्षणिक मदत,महाआरोग्य शिबीर, शेतकऱ्यांनसाठी मोफत पिक विमा शिबीर व गुणवंत विद्यार्थी व मागदर्शक शिक्षकांचा सत्कार हा उप्रकम सर्वच गावांना आदर्शवत असून अस आपल्या मानधनातून गावांसाठी खर्च करणारी पहीलीच सावली ग्रामपंचायत असावी असे गौरवोउद्गगार जावळीचे प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांनी काढले .

विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करताना दादासाहेब दराडे, हणमंतराव कोळेकर, मनोज भोसले,संजय बैलकर,संजय धुमाळ

सावली येथे सावली गावातील गरीब, गरजू विद्यार्थी यांना मोफत गणवेश वाटप, गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिक यांचा सत्कार, महाआरोग्य शिबीर व शेतकऱ्यांसाठी पिकविमा शिबीर यांचा शुभारंभ कार्यक्रमात प्रांतधिकारी दादासाहेब दराडे बोलत होते .
यावेळी तहसिलदार हणमंतराव कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, निवडणुक नायब तहसिलदार संजय बैलकर, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, तालुका कृषी अधिकारी संजय घोरपडे, सरपंच विजय सपकाळ. शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल,, चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख विजय देशमुख आदी उपस्थित होते .

प्रांतधिकारी दादासाहेब दराडे म्हणाले, सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य खरोखरच उतलेखनिय लोकउपयोगी कार्यक्रम राबवित असून सर्वसामान्याना याचा निश्चित फायदा होत आहे . मी सुद्धा प्राथमिक शाळेतूनच शिकलो आणि आज अधिकारी झालो . प्राथमिक शाळेतच खरी गुणवत्तेची खाण असून आजही दर्जा कायम आहे . शेतकर्यांनी अधिकाधिक पिकविम्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले . तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांनी या समाजउपयोगी कार्यक्रमांबाबत सावली ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक करून सावली गावाला सर्वोतपरी सहकार्य करू . गटविकास अधिकारी मनोज भोसले गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी सावली गावच्या विविध उपक्रमांचे आणि गुणवतेचे कौतुक करून सर्वात परी सहकार्य देवू असे स्पष्ट केले . प्रत्येक शेतकऱ्यांनी पिकविमा उतरावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय घोरपडे यांनी केले .

सावली गावचे सरपंच विजय सपकाळ, उपसरपंच बाबुराव भिलारे, सावली ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा जुनघरे, सुरेश कांबळे, सदस्या आनंदी प्रकाश जुनघरे, वनिता संदीप म्हस्कर, रूपाली विजय जुनघरे व निर्मला नथुराम जुनघरे यांनी आपले सात महिन्यांचे मानधनातून हा समाज उपयोगी कार्यक्रम यशस्वीपणे राबविला . यामध्ये गावातील गरीब, गरजू व सर्वसामान्य कटुंबातील मागेल त्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले . तसेच महाआरोग्य शिबीर घेवून त्यामध्ये शाहू नेत्र चिकित्सालय यांच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर, अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले . त्याचबरोबर पिरॅमल फौंडेशन , प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर यांच्यावतीने शुगर, बी . पी .ची व मोफत कॅन्सर तपासणी करण्यात आल्या . यावेळी रुग्णांना मोफत गोळ्या औषधांचेही वाटप करण्यात आले . डॉ पांढरे सह त्यांचे सहकारी व आशा शैला म्हस्कर यांचे सहकार्य मिळाले .

त्याचबरोबर यावेळी शेतकरी बांधवांचा पिकविमाही मोफत काढण्यात आला . तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी कौस्तुभ लक्ष्मण मोरे ( राज्यात ६ वा), अद्वैत विनोदकुमार जुनघरे (राज्यात ९ वा ) व मार्गदर्शक शिक्षक अंकुश सपकाळ , मुख्याध्यापक रघुनाथ दळवी,तानाजी केमदारणे, प्रताप धनावडे तसेच क्रांती विद्यालय सावली च्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी श्रुती सुनिल धनावडे , समिक्षा दत्तात्रय सपकाळ , NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी समृद्धी एकनाथ मोरे, समिक्षा दत्तात्रय सपकाळ , सृष्टी संतोष कांबळे व क्रांती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिल्या निंबाळकर सह सर्व शिक्षक तसेच ग्रामसेवक दिलीप राक्षे व कर्मचारी रविंद्र जुनघरे यांचा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला .

यावेळी मंडलाधिकारी उमेश डोईफोडे, पिकविमा समन्वयक प्रसन्न करडे, मुख्याध्यापिका अहिल्या निंबाळकर, रघुनाथ दळवी, कृषी सहायक विलास कदम, आ.को . म्हस्कर गुरुजी, माजी उपसरपंच वसंतराव म्हस्कर, माजी सरपंच दुर्योधन जुनघरे, अध्यक्ष संदीप म्हस्कर, पोलिस पाटील संजय कांबळे, पाणलोट समितीचे अध्यक्ष पांडूरंग जुनघरे, चेअरमन विनोदकुमार जुनघरे, युवा नेते प्रशांत जुनघरे, विजय जुनघरे, चंद्रकांत लोहार,माजी उपसरपंच विश्वनाथ जुनघरे, माजी सदस्य ज्ञानदेव जुनघरे, धोडींबा जुनघरे, शंकरराव मोरे,यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .नामदेव जुनघरे गुरुजी यांनी स्वागत केले . सरपंच विजय सपकाळ यांनी प्रास्ताविक केले .अध्यक्ष संदीप म्हस्कर यांनी आभार मानले .

कोट : विजय सपकाळ सरपंच सावली आपल्या गावांमुळेच सरपंच उपसरपंच व सदस्य होण्याचा बहुमान मिळाला, त्यातून मिळाणारे मानधन गावचा विकास , आरोग्य आणि सेवा करण्यासाठी आमचा निर्णय झाला आणि हा कार्यक्रम केला . यातून सर्वसामान्यांना लाभ मिळाला हाच मोठा आम्हांला आनंद .

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!