
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
सातारा दिनांक.२० . सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी समर्थकृपा फेडरेशन रत्ननिधी फाउंडेशन व रोटरी क्लब सातारा कॅप यांच्या वतीने सातारा जिल्ह्यात दिनांक 23 ते 27 ऑगस्ट या दरम्यान जयपूर फूट कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे . हा कॅम्प मोफत असून सुमारे 1000 दिव्यांग बांधवांना याचा लाभ होईल अशी माहिती रोटरीचे प्रांतपाल डॉक्टर शंकर गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी समन्वयक प्रद्युम्न आगटे स्वाती हेरकल, अजित करडे, शशिकांत रसाळ, विजय बाचुलकर, इत्यादी यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर गोसावी पुढे म्हणाले 23 ऑगस्ट रोजी हा कॅम्प डॉक्टर मिरजकर हॉस्पिटल मधलीअळी वाई, येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी हा कॅम्प संतोबा कबुले हॉल पोलीस स्टेशन जवळ शिरवळ,दिनांक 25 ऑगस्ट रोजी साताऱ्यात हॉटेल श्रीमान न्यू आरटीओ ऑफिस समोर सातारा, दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी कृष्णाबाई सांस्कृतिक कार्यालय सोमवार पेठ कराड येथे आयोजित करण्यात आला आहे . या कॅम्पचा सातारा जिल्ह्यातील किमान 1000 दिव्यांग बांधवांना लाभ होईल अशा पद्धतीने याचे आयोजन करण्यात आले आहे . पोलिओग्रस्तांसाठी कॅलिपर्स किंवा क्रंचेस पाय व हात नसलेल्या अपंगांसाठी जयपूर फूट व कृत्रिम हात याचे मोजमाप घेऊन हे साहित्य मागवण्यात येणार आहे . त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा संबंधित दिव्यांगांना बोलावून त्यांना या साहित्याचा लाभ देण्यात येईल . दिव्यांगांना साहित्य सोबत चालण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे प्रत्येक शिबिराची वेळ सकाळी 11 ते दुपारी पाच अशी राहणार आहे.
अधिक माहितीसाठी समर्थ कृपा फेडरेशन संचालक श्रीकांत शेटे, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 31 32 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल, व रोटरी इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट एक्झिक्यूटिव्ह सेक्रेटरी प्रमोद शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.