सातारासामाजिक

सातारा बंदला चांगला प्रतिसाद, मान्यवरांनी मानले सातारकरांचे आभार

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —– अजित जगताप

सातारा दि: ग्रामीण भागातील मराठा समाज आता शेती उद्योगापासून दूर झालेला असल्याने या अन्नदात्याची अवस्था बिकट झालेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सातारा बंदची हाक दिली होती. सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या बंदमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. हा बंद शांततेने पाळल्याबद्दल अनेक मान्यवरांनी सातारकरांचे आभार मानले आहेत.


शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. एसटी बसेस वगळता जिल्ह्यातील इतर वडाप, सातारा शहरातील रिक्षा वाहतूक बंद होती. गोंदवले येथे एका एस टीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेकीचा प्रकार घडला . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही सातारा शहरातील बंदची पाहणी केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मराठा तरुण मनोज जरांगे पाटील यांनी गेली सात दिवस उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या पाठींब्यासाठी सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यानुसार सातारा शहरात सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नव्हती. सातारा बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोमवारी तोडलेला भाजीपाला विक्रीला आणला होता. बंद असल्याने सकाळी लवकरच व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी केला. परंतु किरकोळ व्यापाऱ्यांनी माल न घेणे पसंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. फळ विक्रेत्यांनी बसस्थानक परिसरात आपले हातगाडे सुरु ठेवले होते. बसस्थानक, पोवई नाका, कासट मार्केट, रविवार पेठ, पोलीस मुख्यालय मार्ग, राजपथ येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. शहरातील शाळा, कॉलेज सुरु होते. शहरातील रिक्षा, वडाप सर्व बंद होते. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बंदोबस्ताची पाहणी केली व काही उपयुक्त सूचना केल्या आज शासकीय कार्यालय सुरू असल्यामुळे रस्त्यावरती वाहनांची वर्दळ दिसत होती पण हा बंद शांततेत असल्यामुळे पोलीस यंत्रणेने खऱ्या अर्थाने सहकार्य केल्याचेच दिसून आले.


महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. एक पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त होता.
ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये आमदार खासदार यांना गाव बंदी करण्यात आली होती. तसे फलकही लावण्यात आले होते परंतु, आज सातारा जावली चे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना आंदोलनकर्त्यांनी जाब विचारला तसेच काही आमदारांनाही आपला नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला. परंतु, सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत आंदोलनकर्त्यांनी फारसा विरोध न दर्शविल्यामुळे आंदोलनकर्त्याची ही सकारात्मक बाजूचे ही अनेकांनी स्वागत केले. कारण ,सध्या मराठा आरक्षणासाठी एक सकारात्मक दृष्ट्या व चर्चा घडवून आणण्यासाठी काही लोकप्रतिनिधींना न दुखवता हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा. अशी अपेक्षा मराठा तरुणांनी व्यक्त केलेली आहे जर लोकप्रतिनिधींना जर गाव बंदी केली तर गावातील येणाऱ्या अडीअडचणी बाबत कुणाकडे धाव घ्यावी. असाही मार्मिक प्रश्न अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.त्याबाबतही विचार होणे गरजेचे असल्याचेही काहींनी नमूद केले आहे.

सातारा येथील बंदचे काही दृश्य ( निनाद जगताप, सातारा)

सातारा येथील बंदचे काही दृश्य ( निनाद जगताप, सातारा)

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!