
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ———
मेढा. दि.३१.जवळवाडी ता.जावली येथिल सकल मराठा समाजाचे वतीने मराठा आरक्षण मिळावे यासाठी कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये ग्रामस्थ, युवक व विद्यार्थी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटी येथे मा.मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत.अन्न-पाण्याचा त्याग करून गेले सात दिवस ते लढा देत आहेत.४०दिवस देवूनही सरकार अजूनही आरक्षण देत नसल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
मा.जरांगे पाटील शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करीत असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळवाडी येथिल सकल मराठा समाजाचे वतीने श्री भैरवनाथ मंदिर जवळवाडी येथून रात्री ८ वाजता कॅन्डल मार्च रॅली सूरू करून मेढा येथिल छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक ते जवळवाडी अशी २ कि.मी.ची भव्य रॅली काढली.या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती खुप मोठ्या प्रमाणात होती. विविध घोषणा देत असताना महिलांमध्ये सरकार बद्दलची चीड दिसून येत होती.
आमची लेकरं अहोरात्र मेहनत घेवून गुणवत्ता मिळवितात पण आरक्षण नसल्याने हाती काहीच लागत नाही असा संताप व्यक्त करीत येत्या दोन दिवसात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकारने दिले नाही तर मात्र सरकारची तिरडी बांधावी लागेल अशा संतप्त भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
जवळवाडी येथे मराठा आरक्षणासाठी आज अनोखी कॅन्डल मार्च रॅली,आरक्षण द्या नाहीतर सरकारची तिरडी बांधु-जवळवाडी येथील महिला कडाडल्या