
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
मेढा.दि.२४. महात्मा गांधी वाचनालयाचे वतीने आयोजीत केलेल्या गौरी सजावट स्पर्धा २०२३ – या स्पधेचा बक्षिस वितरण समारंभ, महिलांसाठी ग्रंथप्रदर्शन , महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच वे०णामाई नदीचा ओठी भरण समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन शनिवार दि. २५ / ११/ २०२३ रोजी संस्थेच्या स्व .विजयाताई थत्ते सभागृहामध्ये दुपारी ३ वा. कर०यात आले आहे.
सदरचा कार्यक्रम मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोषजी तासगांवकर यांचे प्रमुख उपस्थीतीमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये फक्त महिलांसाठी शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय सातारा यांचे वतीने मोफत नेत्र तपासणी , दिशा डायग्नोस्टिक सेंटर /श्री. स्वामी समर्थ पॅथॉलॉजी लॅब मेढा डॉ.मनिषा साळूंखे यांचे वतीने मोफत रक्त तपासणी, मोरया डेंटल क्लिनीक मेढा डॉ. सौरभ सपकाळ- यांचे वतीने मोफत दंत चिकित्सा व तपासणी दुपारी १ ते ४ या वेळेत कर०यात येणार आहे.
त्यानंतर बक्षिस वितरण समारंभ व नंतर वे०णामाई नदीचा ओठी भरण समारंभ संपन्न होणार तरी मेढा नगरीतील महिलांनी आरोग्य शिबीराचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा . असे आवाहन संयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.