सातारासामाजिक

गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे “आदर्श कामगार पुरस्कार २०२४” जाहीर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——– 

मेढा.दि.२९. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने देण्यात येणाऱ्या “आदर्श कामगार पुरस्कार २०२४” चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.गुणवंत कामगार प्रतिष्ठानने गेली २७ वर्षे सातत्यपूर्ण चालविलेल्या या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून दाखल झालेल्या प्रस्तवांपैकी मुलाखतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना मुलाखतीस बोलावले होते. त्यानुसार या पुरस्कारांसाठी १) श्री. संजय भैरु जाधव(गोदरेज अँड बॉईस मँन्यु. कं. लि., लॉकिम मोटर्स, शिंदेवाडी, शिरवळ २) श्री.मकरंद बाबुराव पवार (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई) ३) श्री.सुरेश हणमंत मोरे (गोदरेज अँड बॉईस मँन्यु. कं. लि., लॉकिम मोटर्स, शिंदेवाडी, शिरवळ ४) श्री. रविंद्र मारुती पवार ( महाराष्ट्र स्कूटर्स लि., सातारा) ५) श्री. शेखर नथू पवार (गरवारे टेक्निकल फायबर्स लि., वाई) यांची निवड करण्यात आली आहे.

 

सदरचा पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दिनांक ०१/०५/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता गोदरेज अँड बॉईस मँन्यु. कं. लि., लॉकिम मोटर्स, शिंदेवाडी, शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे कंपनीचे प्रांगनामध्ये मा.श्री. शैलेंद्र पोळ साहेब (अपर कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग, पुणे) यांचे शुभहस्ते मा.श्री रेवणनाथ भिसले साहेब (सहाय्यक कामगार आयुक्त, सातारा) व मा.श्री अभय पेंडसे साहेब ( व्हॉईस प्रेसिडेंट अँड प्लांट हेड, गोदरेज अँड बॉईस मँन्यु. कं. लि., लॉकिम मोटर्स, शिंदेवाडी, शिरवळ यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच श्री इकबाल काझी, अध्यक्ष, गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे अध्यक्षतेखाली दिमाखदार स्वरूपात संपन्न होणार आहे.

 

तरी या पुरस्कार वितरण समारंभास सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिक, बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने कार्याध्यक्ष श्री जयंत देशपांडे, सरचिटणीस श्री महेन्द्र पवार, खजिनदार श्री अमृत साळुंखे ज्येष्ठ सल्लागार श्री. रघुवीर आपटे, श्री. दिलीप चरेगावकर, श्री. गोपाळ खजुरे, श्री. सुरेश साधले, श्री. अशोकराव जाधव, श्री. गजानन घाडगे जिल्हा संघटक महेंद्र धनवे, जिल्हा समन्वयक संजय पवार प्रसिद्धी प्रमुख श्री राजकुमार पवार व श्री. अभिजीत शिंगटे यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!