अपघात

यवतेश्वर घाटात दोन कारची समोरासमोर धडक एक युवती ठार,पाचजण जखमी,

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

सातारा. दि.२९. यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत, तर सातारा नगरपालिका येथे भरती झालेली गायत्री दीपक आहेरराव (वय २१) ही युवती यवतेश्वर येथे झालेल्या अपघातात मृत पावली आहे. सर्व जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास सातारा – कास रस्त्यावर यवतेश्वर घाटाजवळ होंडा सिटी व क्रेटा या कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थितांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. सातारा तालुका पोलिस रात्री उशिरापर्यंत अपघातस्थळी होते. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. घटनेची माहिती कळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे जवानही मदतीसाठी तत्काळ दाखल झाले होते.

या अपघाताची नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पण यवतेश्वर घाट परिसरात मुसळधार पाऊस असल्यामुळे तसेच दाट धुक्यामुळे समोरची गाडीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साताऱ्याहून कासकडे जाणाऱ्या व साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या व स्थानिक नागरिकांच्या वाहनांची रात्रीच्या वेळी मोठी वर्दळ असते. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

यवतेश्वर येथे झालेल्या अपघातात मृत पावलेली युवती सातारा नगरपालिकेची कर्मचारी दिड वर्षांपूर्वी सातारा नगरपालिका येथे भरती झालेली गायत्री आहेरराव (वय २१) ही युवती यवतेश्वर येथे झालेल्या अपघातात मृत पावली आहे. काही वर्षांपूर्वी तिचे वडील दिपक आहेरराव हे देखील अपघातामध्ये मृत पावले होते. तेही सातारा नगरपालिकेचे कर्मचारी होते. अगदी तरुण वयात गायत्री हिचे अपघाती निधन झाल्याने सातारा नगरपालिकेचे कर्मचारी व सातारकर नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!