निधन वार्तामहाराष्ट्र

सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

वयाच्या 89 वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——-

मुंबई.दि.२६.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. वयाच्या 89 वर्षी त्यांनी नवी मुंबईतील नेरूळ येथे अखेरचा श्वास घेतला.

 

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे झाला. बाबा महाराज सातारकर यांच्या वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी आपले रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचे व्रत होते.त्यांनी आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले. वारकरी सांप्रदायामध्ये बाबा महाराज सातारकर यांना विशेष आदर होता. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे.कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले.

बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ०५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!