
स्टार ११महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे
मेढा.दि.१६. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने आदर्श कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ मे कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिला जाणारा सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग, साखर कारखाने, तसेच सहकारी बँकिंग व जे उद्योग व्यवसाय महाराष्ट्र शासनाचे कामगार कल्याण मंडळाचे सभासद आहेत अशा व्यवस्थापनातील कामगार कर्मचारी यांना ” आदर्श कामगार पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
संबंथितांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज व्यवस्थापनाचे शिफारशींसह श्री इकबाल काझी अध्यक्ष रा. प्लॉट नं १८ अ ,सव्हें नं१२ / १ अ सहयोग कॉलनी तामजाईनगर , करंजे तर्फ सातारा मो.नं.9850507086 किंवा श्री. महेंद्र पवार सरचिटणीस रा. शिवाजीनगर कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा मो नंबर.9975974581 या पत्त्यावर दिनांक २४ एप्रिल २०२२ पूर्वी पोहोचतील असे पाठवावेत असे गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांनी सूचित केले आहे.
या पुरस्कारासाठी व्यवस्थापन स्तरावरील व्यक्तीखेरीज अन्य कामगार कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल. सदर पुरस्कारासाठी आलेल्या अर्जामधून पात्र अर्जाची छाननी करून प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड झालेल्या पुरस्कार्थीचा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांचे हस्ते होणार आहे. अधिक माहितीसाठी व नमुना अर्जा करीता श्री. जयंत देशपांडे सातारा मो.नं9860102382, सौ श्रध्दा करंदीकर सातारा मो.नं.9403704422 , श्री.अमृत साळुंखे वाई 7588384663, श्री.संजय पवार खंडाळा 9850695549 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री इकबाल काझी,सरचिटणीस श्री.महेंद्र पवार यांनी केले आहे.



