धार्मिकमहाराष्ट्रसातारा

कुडाळ गावची वार्षिक यात्रा 27-28 एप्रिलला होणार साजरी

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


कुडाळ.दि.२२.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षांपासून यात्रा,सण समारंभ अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थित झाले होते.मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर-श्री वाकडेश्वर देवांचे उत्सव साजरे होण्यास सुरुवात झाली आहे.

कुडाळच्या यात्रेच्या कार्यक्रमास चैत्र शुद्ध द्वादशीला सुरूवात होते.या दिवशी देवतांना हळदी लागल्या जातात. यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेला रात्री बारा वाजता देवाची लग्न पार पडतात. देवांच्या लग्नासाठी मंदिर परिसर सजवला जातो. गावातील प्रत्येक समाजाला देवाच्या विवाह बाबतीत असणारे मान ठरवून दिलेल्या आहेत.प्रत्येक समाज देवतांची सेवा करत असतो अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हा शाही विवाह सोहळा पार पाडतो. लग्नाच्या नंतर त्याच रात्री गोंधळाचा कार्यक्रम असतो. यानंतर येणाऱ्या षष्ठीला जर बुधवार आला तर त्या बुधवारी देवदेवतांची यात्रा भरते. बुधवार न आल्यास त्यापुढील बुधवारी यात्रा भरते.यावर्षी बुधवारी चतुर्थी आल्याने यापुढील बुधवारी म्हणजे दिनांक 27-28 एप्रिल रोजी कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर- श्री वाकडेश्वर देवतांची यात्रा संपन्न होणार आहे.
यात्रेदिवशी वाई वरून हागीरांच्या मानाच्या सासनकाठी येतात. त्याच बरोबर त्यांच्या पाठोपाठ कुडाळ गावातील प्रत्येक समाजाची सासन काटी सजवून तयार केली जाते. तीन ते चारच्या दरम्यान काट्या निघतात आणि आठ वाजेपर्यंत हा विधी पार पडतो.साडे अकरा पर्यंत देवांचा छबिना चालू होतो.त्याकरता कुडाळ मधील नागरिक ढोल घेऊन उपस्थित राहतात. छबिना पहाटे चार पर्यंत चालतो. मोठ्या उत्साहात हा उत्सव संपन्न होतो.दुसऱ्या दिवशी देवांना पहाटे स्नान घातले जाते.विधिवत पुजा केली जाते. या दिवशी कुस्त्यांचा फड ,मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.यात्रेसाठी मोठ्या भक्तिभावाने येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. सर्वांच्या उपस्थितीत भक्तीभावाने मोठ्या उत्साहात हा यात्रा उत्सव पार पडतो. साधारणपणे बारा ते पंधरा दिवसांचा सोहळा अतिशय भक्तिमय ,उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होतो.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!