मेढा सेंटर वि.का. स.सेवा सहकारी सोसायटी करीता श्री भैरवनाथ शेतकरी सभासद सहकार पॅनल आणि. श्री काळभैरवनाथ शेतकरी सहकार पॅनल मध्ये रंगणार निवडणूक

स्टार ११ महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे
मेढा. दि.२२.जावली तालुक्यातील मेढा सेंटर सोसायटीची निवडणूक चांगलीच रंगात आली असून श्री भैरवनाथ शेतकरी सभासद सहकार पॅनल आणि श्री काळभैरवनाथ शेतकरी सहकार पॅनल अशी दुरंगी लढतीकडे सर्व सभासदांचे, पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जावळीचे आमदार श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्री .ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष श्री.वसंतराव मानकुंबरे आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत श्री.काळभैरवनाथ शेतकरी सहकार पॅनल घेवुन ही लढत होत असुन महविकास आघाडीचे वतीने विधान परिषदेचे आमदार श्री शशिकांत शिदे.माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ. जिल्हा परिषद चे माजी अर्थ सभापती अमित कदम, शिवसेनेचे एस. एस.पार्टे, आणि विविध पदाधिकारी सर्व मिळून श्री. भैरवनाथ शेतकरी सभासद सहकार पॅनल सोसायटीची निवडणुक लढवित असल्याने या हेवीवेट लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या दोन्ही पॅनलच्या वतीने विजयाची दावेदारी सांगितली जात असून सुमारे एक हजार सातशे सभासद असणाऱ्या मेढा सेंटर सोसायटीत विमान बाजी मारणार कि कपबशी आपले वर्चस्व निर्माण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .मेढा आणि परिसरातील गावातुन हे सभासद निवडले जाणार असल्याने सभासदांच्या भाऊबंदकीच्या या खेळात नक्की काय घडणार याची चर्चा सुरू असून काही सभासदांनी हि निवडणुक खरे तर बिनविरोध होणे गरजेचे असताना काही हट्टी राजकारणी लोकांमुळे निवडणुक लादली गेल्याने संस्थेला भुर्दंड बसणार अशी भिती व्यक्त केली आहे.
सोमवार दि.२५ एप्रिल २०२२ रोजी या मेढा सेंटर सोसायटी करीता सकाळी ८ते सायं ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून त्यानंतर लगेच मतमोजणीची प्रक्रिया होवून निकाल जाहीर होणार असल्याने या निकालाकडे सर्व जावलीकरांचे लक्ष लागले असून सोसायटीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे वर्चस्व राहणार की महाविकास आघाडी चे नेते बदल घडवणार हे पहावयास मिळणार आहे.



