महाराष्ट्रसातारासामाजिक

आई-वडीलांच्या स्मरणार्थ आपटी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट….

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

कास. दि.२३. दुर्गम बामणोली भागातील जि.प.प्राथमिक शाळा आपटीला कै.साळाबाई भैरु कदम (आजी)यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईला राहूनही शालेय शिक्षणाविषयी आस्था असणारा त्यांचा नातु आनंद नारायण कदम यांनी त्यांचे दिवंगत आई-वडील कै.तानाबाई नारायण कदम व कै. नारायण भैरु कदम यांच्या स्मरणार्थ स्मार्ट टीव्ही भेट दिला.          या कार्यक्रमाच्या वेळी प्रख्यात किर्तनकार ह.भ.प.सौ. भगवती महाराज सातारकर यांच्या हस्ते हा टिव्ही प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक संतोष कदम, गणेश कदम, आनंद जाधव, नितीन जाधव हे उपस्थित होते. शाळेस स्मार्ट टीव्ही दिल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख अलका संकपाळ यांनी आनंद कदम यांचे अभिनंदन केले. टिव्ही मिळवण्यासाठी संतोष कदम यांनी परिश्रम घेतले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!