
स्टार ११ महाराष्ट्र – युवराज धुमाळ
मेढा.दि.२४. जागतिक पुस्तक दिना निमित्त,द युनिक अकॅडमी पुणे व आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षेतील अभ्यास तंत्रे आणि ग्रंथालयाचा वापर” या विषयावर नॅशनल वेबिनार संपन्न झाले. सूत्रसंचालन वेबीनार चे समन्वयक डॉ. सुधीर नगरकर यांनी केले तसेच प्रास्ताविकात विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वापरली जाणारी अभ्यास तंत्रे कोणती, ग्रंथालयाच्या वापर या वेबीनारचा उद्देश सांगितला. 
प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते प्रा. कैलास भालेकर, द युनिक अकॅडमी, पुणे यांनी आपल्या व्याख्यानात वाचनाचे महत्व, ग्रंथालयाचे महत्व, वाचनाचे स्पीड, वाचनाची आवड, संदर्भ ग्रंथांचा नेमका कसा वापर करावयाचा, वर्तमान पत्राचे वाचन करून प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करायचा, असे स्पर्धा परीक्षांविषयी इतंभूत मार्गदर्शन केले. या वेबिनार च्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे हे होते, त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल च्या युगामध्ये सुद्धा वाचन अभिरुची टिकून आहे . मात्र स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा योग्य वापर करून आपल्या अभ्यास तंत्रांमध्ये सुधारणा करुन आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी केला तसेच प्रा. शंकर गेजगे यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मा. श्री चंद्रकांत खराटे सर तसेच युनिक अकॅडमी तील टेक्निकल टीम यांची मदत झाली. तसेच डॉ. ओंकार यादव, प्रा. पी डी पाटिल व प्रा. आमेय देसाई यांची व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या वेबिनार चा लाभ महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतला .



