स्टार ११ महाराष्ट्र – संजय वांगडे
कुसुंबी. दि.२६.पिंपरी गावचे माजी सरपंच डॉ.रामदास दिनकर वांगडे हे मेढा विकास सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये ४६२ मते घेऊन ८ मतांनी निवडून आले. यामध्ये डॉ.वांगडे हे सर्वांच्या मदतीला धावून जाणे आणि पशुसेवेच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क असले कारणामुळे ते निवडून आले.पिंपरी गावातील स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवत सर्वांच्या सहकार्यतुन पिंपरी गावाच्या एकीचा हा विजय आहे.
मिनी पंचायत समिती या भावनेने या निवडणूकीकडे पाहिले जात होते,राजकिय प्रवाह मध्ये श्री रामदास वांगडे हे निवडून आले त्यामुळे तालुक्यातील जनतेकडून तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी त्यांचे विषेश अभिनंदन केले.
तसेच पिंपरी गावातील इच्छुक उमेदवार श्री.शामराव वांगडे श्री.लक्ष्मण पवार श्री मारुती वांगडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेवून डॉ. वांगडे यांना पाठींबा दिला म्हणूनच डॉ.वांगडे यांचा विजय झाला असे जनतेकडून बोलले जात आहे.विजयी उमेदवारांनी सर्वांना खूप खूप धन्यवाद देत सर्व मतदार यांचे आभार मानत ज्ञात अज्ञान व्यक्तींनी सुद्धा मदत केली याबद्दल सर्वांचे आभार मानले.



