निवासी अभ्यास केंद्र विदयार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा पाया – किशोरदादा गणाई

स्टार ११ महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे
मेढा.दि.०७ छात्रशक्ती संस्थेअंतर्गत नक्षत्र मैत्रकूल निवासी अभ्यास केंद्र विदयार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा पाया आहे असा विश्वास किशोरदादा गणाई यांनी व्यक्त केला.
भामघर गावचे माजी पोलिस पाटील श्री. रामचंद्र सावंत यांनी आपल्या स्वखर्चाने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात या निवासी अभ्यास केंद्राचा शुभारंभ आयोजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भामघर गावचे सरपंच प्रकाश सावले, पत्रकार अभिजीत शिंगटे, राष्ट्रसेवाादलाच्या सौ. जयश्री माजगावकर ,बापू सावले, किसन सावले, नारायण सावंत , बबन पार्टे, शंकर सावले तसेच ग्रामस्थ, महिला वर्ग, उपस्थित होते.
अधिक बोलताना त्यांनी मैत्रकूल जीवन विकास केंद्राच्या माध्यमातुन समाजसेवेचे व्रत हाती घेवून शिक्षणापासून वंचित राहिलेली मूले, मूली यांचा विकास करून त्यांचे चांगले व्यक्तीमत्व देशाच्या जडणघडणीत आणण्याचे कार्य या विकास केंद्राच्या माध्यमातुन घडविले जात असून आदरणीय छत्रपती शाहू महाराजांपासून सुरु झालेली वसतीगृह संकल्पना पूढे चालविण्याच्या हेतुनेच छात्रशक्ती संस्थेने गोरगरीब मुला-मुलींचे निवासी अभ्यास केद्र उपक्रम भामघर येथे” नक्षत्र मैत्रकूल ” म्हणून करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी पोलिस पाटील श्री. रामचंद्र सावंत यांनी आपले भाषणात या भागातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुला- मुलीना नक्षत्र मैत्रकूलच्या माध्यमातुन शिक्षण व्यवस्था प्रात्त होत असल्याने समाधान होत आहे असे सांगितले . या कार्यक्रमावेळी रांगोळी स्पर्धात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या अंशू भामघरे, द्वितीय क्रमांक संध्या सावले, तृतीय क्रमांक मुक्ताबाई सावले,उत्तेजनार्थ उज्वला झुंझरे यांना नक्षत्र मैत्रकूलचे पदाधिकारी यांचे वतीने बक्षिसे देवून गौरविण्यात आले. श्री. रामचंद्र सावंत आणि सौ. अनुसया सावंत यांनी समाजपयोगी कार्यात आपले योगदान देवून केलेले कार्य उल्लेखनिय असल्याचे मत भामघर ग्रामस्थांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नक्षत्र मै. प्र. संचालक मंथन घरत, मैत्रकूल व्यवस्थापक जितेश पाटील शुभमराऊत, हरिश्चंद्र भोसले, चेतन कांबळे, सागर वाघ, आशिष जगताप यांनी परिश्रम घेतले तसेच आदित्य सावले,रोहित सावले, साहिल वाघदरे, प्रथमेश सावले, वेदांत गाढवे, रुद्र जगताप आणि सर्व सहकारी तसेच भामघर गावचे ग्रामस्थ, विविध सामाजिक मंडळे, युवक, युवती, आबालवृद्ध यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संस्थापक मैत्रकूल जीवन विकास केंद्र
- छात्रशक्ती संस्थेच्या माध्यमातुन मैत्रकूलची निर्मिती समाजातील दुर्बल व वंचित घटकांचा सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने झाली असून या मूलांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची उमेद मैत्रकूल देत असून समाजासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या युवकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी याची निर्मिती केली आहे.



