
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क युवराज धुमाळ
केळघर.दि.११.स्वर्गीय श्रीमंत छत्रपती माजी मंत्री अभयसिंहराजे भोंसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य कीर्तन महोत्सव व वारकरी संतांचे थेट वंशज यांच्या दर्शन सोहळ्याचा प्रारंभ येत्या
गुरुवारी दि.१२ मे ते सोमवार दि.१६ मे पर्यंत असा पाच दिवसाचा भव्य दिव्य किर्तन महोत्सव करंजे तर्फ मेढा येथे मुख्य रस्त्यालगत आयोजीत केला आहे . तरी या किर्तन महोत्सवाला सर्वांमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री छ.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
या किर्तन महोत्सवाचा प्रारंभ येत्या गुरुवारी ता.१२ रोज़ी संत शिरोमणि नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह.भ. प.ज्ञानेश्वर महाराज नामदास पंढरपुर यांचे कीर्तन होणार आहे . त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.१३ रोज़ी शान्तिब्रम्ह एकनाथ महाराज यांचे वंशज ह भ प योगिराज महाराज पैठनकर यांचे कीर्तन होणार आहे . तिसऱ्या दिवशी शनिवार दि १४ मे रोज़ी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह भ प पुंडलिक महाराज देहुकर यांचे कीर्तन होणार आहे . चौथ्या दिवशी रविवार दि .१५ मे रोज़ी माउली ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिनिधि ह.भ.प.गोविन्द महाराज गोरे आळंदीकर यांचे कीर्तन होणार असून पाचवा दिवशी किर्तन महोत्सवाची समाप्ती सोमवार १६ मे रोज़ी सकाळी १० ते १२ या वेळेत रामायण व भागवत कथा प्रवक्ते ह भ प माधव महाराज रसाळ पुणे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे .
किर्तन महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध किर्तनकार यांचा किर्तनसोहळा रोज़ सायंकाळी ७ ते ९ होणार असून रात्री ९ नंतर सर्व भाविक व उपस्थित भक्ताना महाप्रसादाचा लाभ मिळवार आहे . याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . या किर्तन महोत्सवाचे
आयोजक,जावली तालुक़ा वारकरी संघ, व जावली तालुक़ा युवक वारकरी संघ असून विशेष सहकार्य-गुरूकुल श्री विट्ठल वारकरी शिक्षण संस्था क्षेत्र आंबेघर व विश्वंभरबाबा वारकरी शिक्षण संथा मेढा यांचे आहे.



