धार्मिकसातारा

कुमठे (कोंडोशी) येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला आजपासून सुरुवात

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

कास.दि.१०.कोयना नदीच्या खोऱ्यात, महाबळेश्वर परिसरातील शिवछत्रपतीं शिवाजी महाराज च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड च्या पायथ्याशी वसलेल्या मौजे- कुमठे (कोंडोशी) या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाई च्या कृपेने परमपूज्य गंगू काका शिरवळकर (पंढरपूर), तसेच गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे (माऊली), यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने व वैकुंठ वाशी ह.भ.प.सोनू बुवा जाधव व वैकुंठ वाशी ह भ प मारुती मोरेश्वर जाधव व वैकुंठ वाशी ह भ प लक्ष्मण बुवा जाधव यांच्या प्रेरणेने मंगळवार दिनांक १० मे ते दिनांक १३ मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रवचन होणार आहे.

परिसरातील भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ कुमठे (कोंडोशी ) यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!