
स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क युवराज धुमाळ
केळघर.दि.११.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कुडाळ ता.जावली या ठिकाणी बुद्ध भीम फेस्टिवल साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे जिल्हा सरचिटणीस किरण बगाडे यांनी दिली.
विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कुडाळ ता.जावळी या ठिकाणी उद्या दिनांक १२/०५/२०२२ रोजी मोठ्या उत्साहात हा फेस्टिवल साजरा करण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष आयु.दादासाहेब ओव्हाळ यांच्यासह सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार असून
या कार्यक्रमानिमित्त गरजू गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच कुडाळ बाजारपेठेतून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच स्नेहभोजनचे आयोजन केले आहे. तरी आंबेडकर प्रेमी आणि धम्म बांधव सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे जिल्हा सरचिटणीस किरण बगाडे यांनी केले आहे.



