सातारासामाजिक

आपल्या मातृभूमीच्या कर्तव्याच्या भावनेतून केला स्तुत्य उपक्रम

स्टार ११महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे

 मेढा.दि.१२.सातासमुद्रापर अमेरीका येथे राहुन आपल्या मातृभूमीविषयी आपुलकी जिव्हाळा जपणारे, श्री. ज्ञानेश ता. सपकाळ व विजय ता.सपकाळ या दोन्ही बंधूनी अण्णासाहेब पाटिल माध्यमिक विद्यालय, म्हाते बु!! येथील गरजू विध्यार्थ्यांना प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी
20 सायकलींचे वाटप करण्यात आले.

या सर्व सायकल हस्तांतरण व वितरण प्रसंगी मातृभूमीच्या कर्तव्यभावनेपोटी दातृत्वाची भावना जपणारे दोन्ही बंधू हे खरे देवदूत असून त्यांच्या सेवाभावी दातृत्वाचा आदर्श इतर सेवाभावी लोकांनी घ्यावा अशी भावना ग्रामस्थांमधून उमटत आहे.पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या दोन्ही बंधूंचे भरभरून कौतुक करून आशीर्वाद दिले. या दोन्ही बंधुनी आतापर्यंत नेहमीच मातृभूमीच्या विकासात सिंहाचा वाटा उचललेला आहे इथुन पुढेही सेवाभावी वृत्तीने आपल्या मातृभूमीच्या कर्तव्यभावणे पोटी कटीबद्ध राहून नेहमीच सहकार्य करणार असल्याचे दोन्ही बंधुनी सांगितले .                          या सामजिक कार्यास सपकाळ बंधूंच्या मोठ्या भगिनीं सौ. अलकाताई देशमुख व ग्रामस्थांचे तसेच शाळेतील शिक्षक वृंदाचे विशेष सहकार्य लाभले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!