महाराष्ट्रसातारासामाजिक

पिंपरी तर्फ मेढा येथे जननी देवी च्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र  – संजय वांगडे

कुसुंबी. दि.१५.पिंपरीत आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पिंपरी तर्फ मेढा येथे जननी देवी च्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे.
यामध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजता हरिपाठ प्रवचन तसेच सात ते नऊ यावेळी ह. भ. प. अतुल महाराज देशमुख गांजे यांची कीर्तन सेवा होणार आहे. रविवारी दि. १५/५/२०२२ रोजी सकाळी सात वाजता रुद्राभिषेक सकाळी नऊ वाजता सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होते. यामध्ये दहा ते बारा या वेळेत ह-भ-प यशवंत महाराज वाटेगावकर यांचे कीर्तन सेवा होणार करण्यात आली, दुपारी एक ते चार यावेळी दिंडी सोहळ्याचे नियोजन करून सायंकाळी चार ते पाच या वेळेत मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे सेवानिवृत्ती झालेल्यांचे सन्मान करण्यात येणार आला यामध्ये गावातील नवतरुण शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला असून कोरोना काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे काम केले अशा लोकांना कोविड योध्दा सन्मान देऊन त्यांचा पिंपरी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर जावली तालुक्यातील तमाम नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!