महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

नवी दिल्ली येथे प्राउड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड २०२२ पुरस्काराने श्री जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांना केले सन्मानित

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –  युवराज धुमाळ

मुंबई.दि.१५.ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी मानवाधिकार ऑर्गनायझेशन,महात्मा गांधी वर्च्युअल युनिव्हर्सिटी व इतर सलग्न संस्थांच्या वतीने भारतातील विविध क्षेत्रातील लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तींना कॉन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडिया,रफी मार्ग नवी दिल्ली, येथे दि.१४/५/२०२२ रोजी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शिवसेना पश्र्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांचे चिरंजीव व शिव सामर्थ्य सेना सरचिटणीस,AIACPC चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांना प्राउड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड २०२२ हा सामाजिक पुरस्कार व आसाम बुक ऑफ रेकॉर्ड चा मानाचा HUMANITARIAN DOCTOR ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच शिव सामर्थ्य सेना मुंबई अध्यक्ष, AIACPC चे मुंबई उपाध्यक्ष,AISRPF चे मुंबई सेक्रेटरी,आणि UHRC चे जॉइंट सेक्रेटरी श्री.सिद्धेश सूर्यकांत मोहिरे यांना महात्मा गांधी नोबल पिस अवॉर्ड २०२२ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी एक्स डिफेन्स ऑफिसर एअर फोर्स, स्कॉर्डण लीडर तुलीपा राणी,सोशल जस्टिस सेक्रेटरी डॉ.मनीष गवई,संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री.अविनाश सकुंडे,अभिनेता शहाबाज खान,आसाम बुक ऑफ रेकॉर्ड चे एम. ए. मुरतझा, अभिनेत्री शिबानी कश्यप,अभिनेत्री ममता यादव व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सर्वांना गौरवण्यात आले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!