
स्टार ११ महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे
मेढा.दि.१६. मेढा येथील आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे शामराव वाघमारे( सर) यांची वंचित बहुजन आघाडी जावळीच्या उपाध्यक्ष पदी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त वाघमारे सर म्हणाले कि मी विध्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीमध्ये भाग घेत आलो. परंतु मधल्या काळात नोकरीमुळे वेळ देता आला नाही. पण आता सेवानिवृत्त झालो आहे. वंचित बहुजन आघाडीने मला दिलेले पदाला मी न्याय देईन. पदापेक्षा आंबेडकर कुटुंबासोबत जोडलो जात आहे. हे विशेष महत्वाचे आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सर , जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई , जिल्हा महासचिव गणेश भिसे संघटक अशोकराव दिक्षीत अध्यक्ष प्रताप सपकाळ . सचिव योगेश कांबळे,सोनार समाज संघटनेचे विजय बापू पंडित , उपाध्यक्ष सुनिल खरात निवडणूक प्रचारप्रमुख मोहन खरात सहसचिव शिरीष मिस्त्री रणजित सुतार अमन चव्हाण, अविनाश देशमुख, संघटक गौतम गाडे इ. उपस्थित होते .



