आरोग्य विषयीमहाराष्ट्रसातारा

जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्यावर सोपविली महाराष्ट्रातील रुग्णसेवेची मोठी जबाबदारी.

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –  युवराज धुमाळ

मुंबई दि.२२.शिवसेना नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शिव सामर्थ्य सेनेचे सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ,यांची बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संपर्क समन्वयक, महाराष्ट्र राज्य, या पदासाठी निवड करण्यात आली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०+१०%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे.गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट,टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात येणार आहे.
सदर नियुक्ती पत्र शिवसेना नेते,नगर विकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ठाणे येथील निवास स्थानी देण्यात आले तसेच त्यांना नुकत्याच मिळालेल्या प्राउड इंडियन पार्लमेंट अवॉर्ड २०२२ हा सामाजिक पुरस्कार व आसाम बुक ऑफ रेकॉर्ड चा मानाचा HUMANITARIAN DOCTOR हे पुरस्कार मिळाले त्याबद्द्ल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
या प्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई सहसमन्वय श्री.अमोल वंजारे ,कक्ष सहाय्यक श्री.माऊली धुळगुंडे,श्री.राम राऊत, मा.संपर्कप्रमुख महाबळेश्वर तालुका श्री.सुरेश कदम,शिव सामर्थ्य सेना संपर्क प्रमुख श्री.अमित देशमुख,ठाणे शहर अध्यक्ष शिव सामर्थ्य सेना श्री.सुशांत घोलप, हितेश गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!